Kolhapur News: साखर कारखान्यांवर उसात काटामारी होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून होत असताना आता नवीन एक गंभीर प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांचे वजनकाटे कोणतेही आदेश नसताना तपासण्यात येऊन ते अचूक असल्याचे सिद्ध करण्यात आले आहे. .विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचे वजनकाटे सातारा जिल्ह्याच्या वैधन मापनशास्त्र कार्यालयातील योगेश अग्रवाल नावाच्या सहायक निरीक्षकाने तपासले आहेत. या प्रकाराची दखल घेत अग्रवाल यांच्या चौकशीचे आदेश साखर आयुक्त संजय कोलते यांनी दिले आहेत. .Sugar Export: साखर निर्यात, एमएसपीबाबत कर्नाटक सरकारकडून श्रेयवाद.कारखान्यांच्या वजनकाट्यांच्या तपासणीवरुन शेतकरी संघटनांनी शंका व्यक्त केली आहे. पुणे साखर संकुल येथे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांसोबत नुकतीच बैठक झाली. यावेळी स्वाभिमानी संभाजीराजे ब्रिगेडचे अध्यक्ष रूपेश पाटील यांनी या तपासणीबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील वैध मापक निरीक्षक दत्तात्रय पवार यांनी, कारखान्यांचे वजनकाटे तपासणीसाठी कोणालाही आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. .Sugar MSP: साखरेच्या ‘एमएसपी’ वाढीबाबत सरकार सकारात्मक.साताऱ्यातून आलेल्या अधिकाऱ्याने कोल्हापुरातील तीनहून कारखान्यांचे वजनकाटे कोणत्याही आदेशांशिवाय तपासण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे..कोल्हापूर जिल्ह्याचे भरारी पथक असताना साताऱ्यातील अधिकाऱ्याला येथे येऊन वजनकाटे तपासण्याचा अधिकारी कोणी दिला? असा सवाल स्वाभिमानी संभाजीराजे ब्रिगेडचे अध्यक्ष रूपेश पाटील यांनी केला आहे. साताऱ्यातील अधिकाऱ्याने कोल्हापुरातील कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी केली. याआधारे काही कारखान्यांनी त्यांचे वजनकाटे अचूक असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे..कोल्हापूरमधील भरारी पथकात साखर आयुक्त कार्यालय, पोलिस, तहसीलदार, लेखा परिक्षण अधिकारी आणि विविध शेतकरी संघटनांच्या दोन प्रतिनिधींचा समावेश आहे. पण या पथकाला कोल्हापुरात २० नोव्हेंबरला झालेल्या वजनकाट्यांच्या तपासणीबाबत कसलीही कल्पना मिळाली नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे..एकीकडे ऊसदर आणि इतर मागण्यांबाबतची चर्चा आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात वजन-मापे कार्यालयाच्या भरारी पथकाने कोणत्याही आदेशांशिवाय काही कारखान्यांचे वजनकाटे तपासल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, वजन-मापक निरीक्षक दत्तात्रय पवार यांनी भरारी पथकाला असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व प्रकारानंतर अग्रवाल यांनी स्वतः वजनकाट्यांची तपासणी केल्याचे कबूल केले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.