Sangli News: शेतकऱ्यांनी ऊस पिकात काय चुकते हे शोधण्याची गरज आहे. यासाठी काटेकोर व्यवस्थापनासह पिकाला तंत्रज्ञानाची जोड दिली तर झालेल्या चुका दुरुस्त करणे सोपे आहे, असे मत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोज वेताळ यांनी व्यक्त केले..बहे (ता. वाळवा) येथील बहे सर्व सेवा सहकारी संस्था सोसायटी येथे गुरुवारी (ता. २०) ‘ॲग्रोवन’ व रिवुलिस इरिगेशन इं.प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादन वाढ, तंत्रज्ञान व व्यवस्थापन या विषयावर ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमाअंतर्गत चर्चासत्र झाले..Sugarcane Crop Management : पूरबाधित ऊस क्षेत्रात करावयाच्या उपाययोजना.चर्चासत्राला बहे सेवा संस्थेचे सहकार्य लाभले. या वेळी विस्तार अधिकारी कृषी मोहन चव्हाण, ‘रिवुलिस इरिगेशन’चे स्टेट मॅनेजर योगेश कुलकर्णी, सांगली, सातारा, कोल्हापूरचे व्यवस्थापक अमित पाटील, किरण खोत, अधिकृत वितरक ऋतुकेश चौगुले, बहे सेवा संस्थेचे चेअरमन आविष्कार नांगरे, व्हाइस चेअरमन भीमराव कुंभार, राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक अविनाश खरात, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..Sugarcane Crop Management : खोडवा उसासाठी अन्नद्रव्ये, सिंचन व्यवस्थापन.श्री. वेताळ म्हणाले, ‘‘ऊस पिकात एआयचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर होऊ लागला आहे. हे तंत्रज्ञान सोपे आहे. या तंत्रामुळे पाणी, खत, बदलते हवामानामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव सांगते. यामुळे शेतकऱ्यांनी एआय तंत्रांचा वापर करून शेती सुलभ करावी.’’.‘रिवुलिस इरिगेशन’चे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नितीन जाधव म्हणाले, ‘‘आमच्या कंपनीने जगातील १२० पेक्षा अधिक देशांमध्ये काम केले आहे. इस्राईलस्थित कंपनीने उपग्रहाद्वारे पीकपाणी नियोजन विकसित केले आहे. मान्ना इरिगेशन ॲपद्वारे शेतकऱ्यांना विविध सुविधा दिल्या आहेत. शेतकऱ्यांना पाणी बचतीसाठी योग्य ते मार्गदर्शन या ॲपद्वारे केले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त रिवुलिसचा ड्रीपरचा दर्जा चांगला असल्याने पिकाच्या गरजेनुसार पाण्याच्या सर्वदूर एकसमान विसर्गाची खात्री रिवुलिसद्वारे दिली जाते.’’ ‘ॲग्रोवन’चे जिल्हा बातमीदार अभिजित डाके यांनी प्रास्ताविक केले. ‘सकाळ’चे बहे बातमीदार संजय पाटील यांनी आभार मानले. ॲग्रोवनचे वितरणचे दत्ता कोळी यांनी स्वागत केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.