MSEDCL  Agrowon
ॲग्रो विशेष

MSEDCL Tariff Update: राज्यात वीजदरात मोठी कपात; आजपासून १०% स्वस्त वीज!

Power Tariff Reduction: महावितरणच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने आजपासून (१ एप्रिल) वीजदरात १०% कपात लागू झाली आहे. पुढील पाच वर्षे विजेचे दर टप्प्याटप्प्याने कमी होणार आहेत. स्मार्ट मीटर बसविणाऱ्या ग्राहकांना ठराविक वेळेत अधिक सूट मिळणार असून, सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत मात्र जादा शुल्क आकारले जाणार आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: वाढत्या वीजदरामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. आजपासून (ता.१) वीज स्वस्त होणार आहे. महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, वीजदर १० टक्क्यांनी कमी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात पुढील ५ वर्षे वीज स्वस्त होणार आहे.

स्मार्ट मीटर (टीओडी) बसविणाऱ्या औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच आणि रात्री बारा ते सकाळी सहापर्यंतच्या वीज वापरास १०-३० टक्के वीजदर सवलत मिळेल. मात्र सायंकाळी पाच ते रात्री १०-१२ वाजेपर्यंतच्या वीज वापरासाठी २० टक्के जादा मोजावे लागतील. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार २०२५-२६ या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे १० टक्के कपात होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवे वीजदर आजपासून लागू होणार आहेत. कृषी ग्राहकांसाठी औद्योगिक, वाणिज्यिक व अन्य ग्राहकांवर पडणारा क्रॉस सबसिडीचा बोजा एक एप्रिलपासून पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे वीजदर कमी होऊन दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीजदर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा काही दिवसांपूर्वी पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती. या घोषणेनुसार वीजदरात बदल करण्यात आले आहेत.

अशी असेल महावितरणची वेळ व दर

वेळ दर

रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत १० ते ३० टक्के (सूट)

सायं. ५ ते रात्री १० वाजेपर्यंत २० टक्के (जादा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement: मका, ज्वारीची १ मेपासून हमीभावाने खरेदी

Tree Plantation: १९ हेक्टरवर ५७ लाख रोपणास ३.६९ कोटी होणार खर्च

Fertilizer Supply: परभणी जिल्ह्यात खरिपासाठी एक लाख ६१ हजार टन खतांचा पुरवठा

Tribal Economy: मोहाच्या फुलांमुळे स्थानिक अर्थकारणाला बळ

Drought Management Committee: जिल्हास्तरीय ‘दुष्काळ व्यवस्थापन समिती’ची नव्याने रचना

SCROLL FOR NEXT