Agriculture Electricity : वीज दिवसाआड, पिकांचे होतेय चिपाड

Power Supply Issue : शेतकऱ्यांना दिवसा आणि मुबलक वीज देण्याचे आश्वासन शासन देते. मात्र, तलवाडा परिसरात महावितरणकडून फिडरचे व्यवस्थित नियोजन न केल्याने एका दिवसाआड वीज मिळते आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Beed News : शेतकऱ्यांना दिवसा आणि मुबलक वीज देण्याचे आश्वासन शासन देते. मात्र, तलवाडा परिसरात महावितरणकडून फिडरचे व्यवस्थित नियोजन न केल्याने एका दिवसाआड वीज मिळते आहे. दिवसाआड वीज पुरवठा होत असल्यामुळे मुबलक पाणी असतानाही उन्हाळी पिके मुबलक पाणी असताना करपत आहेत.

गेवराई तालुक्याला गोदावरी नदी आणि उजवा कालवा लाभल्याने या भागात उसाचे मोठे क्षेत्र आहे. डिसेंबर ते जानेवारीपर्यंत उसाची लागवड झाल्याने हे पिक सुरवातीच्या अवस्थेत आहे. तसेच उन्हाळी बाजरी, भुईमूग यासह मोसंबी, डाळींब या फळबागा बहरात आहेत.

Crop Damage
Hail Crop Damage : जत तालुक्यात गारपिटीने दोन कोटी रुपयांचे नुकसान

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पिकांना पाण्याची गरज अधिक वाढली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देणे मुश्किल होऊन बसले आहे.

Crop Damage
Crop Damage : प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पिके करपली

तलवाडा उपकेंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना दररोज वीज मिळणे कठीण बनते. एक दिवसाआड वीजपुरवठा अघोषित कायदा सुरु केल्याने शेतकऱ्यांची उभी पिके वाळून जात आहेत.

शिवारात योगायोगाने यंदा पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. असे असले तरी वीज नसल्यमुळे पिकांची भिजवणी होत नसल्याने करपत चालले आहेत. त्यामुळे वीज पुरवठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com