Rural Income: विक्रमगड, जव्हार, मोखाडा या आदिवासी दुर्गम भागातील जंगलसंपदा ही स्थानिकांसाठी केवळ निसर्गसौंदर्य नसून उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. औषधी वनस्पती, रानभाज्या यासह मोहाचे वृक्ष ग्रामीण व आदिवासी कुटुंबांच्या अर्थकारणाला बळ देणारे ठरत आहेत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी व मजूरवर्गासाठी मोहाचे झाड हे ‘कल्पवृक्ष’ ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे..ग्रामीण भागात आंब्यानंतर मोहाच्या झाडाला दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्व आहे. या झाडापासून मिळणारे लाकूड उन्हापासून, वाऱ्यापासून व पावसापासून संरक्षण देण्यासाठी उपयोगी पडते. पावसाळ्यात झाडांची पालवी सुकून तयार होणारा पालापाचोळा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. शेतकरी हा पाला गोळा करून जाळतात व त्यापासून तयार होणारे सेंद्रिय खत भातशेतीसाठी वापरतात..Indian Economy Growth: जागतिक अनिश्चिततेत भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी.मोहाच्या झाडाची खरी आर्थिक किंमत मात्र त्याची फुले, फळे व बियांमधून समोर येते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोहाला पिवळसर फुले येतात. ही फुले सकाळी व दुपारपर्यंत वेचून सुकवली जातात. बाजारात या सुकलेल्या फुलांना प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये दर मिळतो. यापासून स्थानिक पातळीवर गावठी मद्य तयार केले जाते. मर्यादित प्रमाणात याचा औषधी उपयोगही केला जातो, अशी स्थानिकांची धारणा आहे..Tribal Economy : ‘शबरी नॅचरल्स’मुळे आदिवासींच्या मोहफुलांना मोलाची किंमत.फुलांनंतर मोहाला येणारी फळे ‘मोहट्या’ (दोडे) म्हणून ओळखली जातात. कच्च्या अवस्थेतील दोड्यांपासून चविष्ट भाजी तयार केली जाते. काही ठिकाणी ही भाजी सुकवून वर्षभरासाठी साठवून ठेवली जाते. पिकलेल्या फळांमधून पाच ते सहा बिया मिळतात. या बियांमधील गाभा ‘डाळंब’ म्हणून ओळखला जातो. हा गाभा सुकवून तेल गिरण्यांमध्ये नेला जातो. एका कुटुंबाकडून हंगामात सुमारे एक क्विंटलपर्यंत बिया गोळा होतात. त्यापासून साधारण २० ते ३० किलोपर्यंत खाद्यतेल मिळते. बाजारात खाद्यतेलाचे वाढते दर (प्रतिकिलो १५० ते २०० रुपये) लक्षात घेता, मोहाच्या तेलामुळे शेतकऱ्यांची वर्षाकाठी १५ ते २५ हजार रुपयांची बचत होत असल्याचे सांगितले जाते..मोहाचे तेल तयार करताना सुरुवातीला ते उकळवून त्यातील कडूपणा कमी केला जातो. काही ठिकाणी नागलीच्या पिठाची भाकर तेलात टाकून शुद्धीकरण केले जाते. हे तेल स्वयंपाकासाठी वापरले जातेच, शिवाय लहान मुलांना ताप किंवा सर्दी झाल्यास घरगुती उपाय म्हणूनही याचा उपयोग केला जातो. मोहाच्या फळांच्या टरफलांचाही शेतीत मोठा उपयोग होतो. ही टरफले शेतात टाकल्यानंतर पावसामुळे ती कुजून नैसर्गिक खत तयार होते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकांची वाढ चांगली होते. एकूणच, मोहाचे झाड हे ग्रामीण व येथील आदिवासी कुटुंबांसाठी बहुउपयोगी ठरत आहे. अन्न, इंधन, तेल आणि खत या सर्व गरजा पूर्ण करणारे महत्त्वाचे साधन बनले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.