Beed ZP Budget : बीड जिल्हा परिषदेचा ९१ लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प

Zila Parishad Administration : असेल. प्रस्तावित खर्च १५ कोटी २१ लाख असून २०२५-२६ साठी ९१ लाख ४३ हजार १०२ इतक्या महसुली शिलकीच्या अर्थसंकल्पास जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी मान्यता दिली.
Beed ZP Budget
Beed ZP budgetAgrowon
Published on
Updated on

Beed News : जिल्हा परिषदेचा मागील शिल्लक व नव्याने जमा होणारा महसूल १६ कोटी १३ लाख ३१ हजार १०२ इतकी असेल. प्रस्तावित खर्च १५ कोटी २१ लाख असून २०२५-२६ साठी ९१ लाख ४३ हजार १०२ इतक्या महसुली शिलकीच्या अर्थसंकल्पास जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी मान्यता दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जीवने यांनी सोमवारी (ता. २४) याविषयीची माहिती सभागृहात दिली. या वेळी प्रकल्प संचालक संगितादेवी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. अर्थसंकल्प मांडताना मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी, ग्रामविकासासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असून विविध महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले आहेत.

Beed ZP Budget
Amravati ZP Budget: अमरावती जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात नावीन्यपूर्ण योजना

ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण, महिलांचे सबलीकरण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या उपक्रमाच्या तरतुदीसह माहिती सादर केली. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी महसुली जमा व खर्चाच्या अंदाजपत्रकीय तरतुदीचे सविस्तर वाचन केले.

Beed ZP Budget
Kolhapur ZP Budget: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ४३ कोटी ६५ लाखांचे अंदाजपत्रक सादर

या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत डॉ. ज्ञानोबा मोकाटे, प्रकल्प संचालक राजेश मोराळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, प्रभारी कार्यकारी अभियंता बांधकाम (१), पशुसंवर्धन अधिकारी विजय देशमुख, आदींसह विभाग प्रमुख उपस्थित होते.

विभागनिहाय तरतुदी

सुरुवातीला मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांनी जिल्हा परिषदेच्या विभागनिहाय खर्चाच्या बाबनिहाय तरतुदी सादर केल्या. त्यानुसार बांधकाम विभाग २ कोटी ४४ लाख १४ हजार, शिक्षण विभाग १ कोटी ७४ लाख ४५ हजार, आरोग्य विभाग ७९ लाख २ हजार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग १ कोटी, समाज कल्याण विभाग ३ कोटी ५१ लक्ष १० हजार, महिला व बालकल्याण विभाग ७४ लक्ष ४ हजार, कृषी विभाग ३० लाख ४० हजार, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग ७४ लाख ३ हजार, वनीकरण विभाग व व्याज १० हजार, पंचायत राज कार्यक्रम विभाग ३ कोटी ९३ लाख ५६ हजार, लघू पाटबंधारे १० हजार ४०० अशा एकूण १५ कोटी २१ लक्ष ८८ हजार रुपयांच्या प्रस्तावित खर्चास मान्यता देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com