Electricity Bill Recovery Agrowon
ॲग्रो विशेष

Power Sopply Disconnect : महावितरणटी 'मार्चएण्ड' लक्ष्यपूर्ती मोहीम वेगात ; अडीच हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Electricity Bill Recovery Drive : महावितरणटी 'मार्चएण्ड' लक्ष्यपूर्ती मोहीम वेगात ; अडीच हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Team Agrowon

Latur News : ‘मार्चएण्ड’च्या पार्श्‍वभूमीवर महावितरणने वीजबिलांची शंभर टक्के वसुली करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. यात बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात येत असून, चोवीस दिवसांत २ हजार ३५६ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

मार्च महिन्याची चाहूल लागताच महावितरणने वीजबिल वसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. थकबाकीसह चालू महिन्याचे वीजबिल वसूल करणे महावितरणसमोर एक आव्हानच असते. आज रोजी लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील लातूर परिमंडळाच्या वीजग्राहकांकडे जानेवारी अखेर २९९ कोटी रुपयांची थकबाकी असून, फेब्रुवारी महिन्याची ८४ कोटी ५४ लाख रुपयांची मागणी आहे.

थकबाकी व मागणी असे एकत्रित ३८३ कोटी ६१ लाख रुपयांची वसुली फेब्रुवारीअखेर पर्यंत करावयाची आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील ९६ कोटी ७७ लाख, बीड जिल्ह्यातील १५९ कोटी ९८ लाख तर धाराशिव जिल्ह्यातील १२६ कोटी ८५ लाख रुपये रकमेचा समावेश आहे. गेल्या २४ दिवसात बीड जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून १९ कोटी ९२ लाख रुपये वसुल झाले आहेत.

तसेच धाराशिव जिल्ह्यातील वीजग्राहकांकडून १६ कोटी २२ लाख रुपये वसूल झाले आहेत. तर लातूर जिल्ह्यातील वीजग्राहकांनी ३३ कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा केला आहे. थकबाकी वसुलीसाठी जनमित्रांसह अधिकारीही वीजबिल वसुलीसाठी फिरत असून गेल्या २४ दिवसांत बिल न भरणाऱ्या २१५७ वीजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा तोडण्यात आला आहे.

तर १९९ वीजग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. वसुली मोहीम मार्चअखेर पर्यंत प्रभावीपणे राबवण्यात येणार असून, वीजग्राहकांनी चालू बीलांसह थकबाकीचाही भरणा करावा, अन्यथा कटू कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा महावितरणने दिला आहे.

कायम स्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या वीजग्राहकांना अभय योजनेअंतर्गत थकबाकी वरील व्याज व दंड माफ करण्यात येणार असून योजनेचा लाभ ग्रहकांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

वीज पुरवठा खंडित जिल्हानिहाय वीजग्राहक

बीड कायमस्वरूपी ९० तात्पुरता ४४७

धाराशिव कायमस्वरूपी ३९ तात्पुरता ९३३

लातूर कायमस्वरूपी ७० तात्पुरता ७७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT