मोनिका गायकवाड, डॉ. विजया पवारबीट हे लोह, जीवनसत्वे, फॉलीक आम्ल आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे. बीटरूट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवते रक्त शुद्ध करते. यातील अँटीऑक्सिडेंट्स (बीटागीयनिन) शरीराला रोगांपासून प्रतिकार करण्याची क्षमता देतात. बीट कच्चे किंवा उकडून खातात. मुळाचे तुकडे शिरक्यात मुरवून त्यापासून लोणचे तयार करतात. त्याच्या मुळांपासून बीटानीन हा रंग मिळतो. तो सॉस, जॅम, जेली इ. खाद्यपदार्थांना रंग येण्यासाठी वापरतात..शुगर बीटचे कंद मांसल, पांढरे आणि शंकूच्या आकाराचे असते. प्रकाशसंश्लेषणातून शर्करेची निर्मिती होते आणि ती मुळांमध्ये साठविली जाते. यात शर्करेचे प्रमाण मुळांच्या वजनाच्या १५ ते २० टक्के असते. याची लागवड भारतासह रशिया, अमेरिका, युरोपातील देशात केली जाते. जगातील साखरेच्या एकूण उत्पादनापैकी २० टक्के साखर ही शुगर बीटपासून केली जाते..Beetroot Farming: बीटरूटने केले अर्थकारण सशक्त.आरोग्यदायी फायदेरक्तदाब नियंत्रणात राहतो. नायट्रेटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.बीट खाण्यामुळे किंवा बीट रस पिण्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल आणि त्रिग्लिसराइड्स कमी होते, चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होतो. बीटामुळे हृदयाच्या मांसपेशीही मजबूत होण्यास मदत होते..मुबलक प्रमाणात लोह आणि फॉलिक ॲसिड असते, त्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. रक्त वाढीसाठी रोज सकाळी एक कप बीट रस जरूर प्यावा.दररोज दोन कप बीट रस पिल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढून व्यायामाचा योग्य फायदा होण्यास मदत होते.बीट किंवा बीट रसात कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीच्या डायट प्लॅनमध्ये याचा समावेश करणे खूप फायदेशीर ठरते कारण, लो-कॅलरीज असणाऱ्या बीट किंवा रसात तंतुमय घटक आणि कॅल्शिअम, लोह यासारखी पोषणतत्त्वे भरपूर असतात. बीट खाण्यामुळे वजन वाढत नाही. तसेच त्यामुळे चरबी कमी करण्यास मदत होते..Beetroot Face Cream : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा बीटरुटची क्रिम.कॅल्शिअम हा घटक आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतो. बीट खाण्यामुळे कॅल्शिअमची कमतरता दूर होऊन आपली हाडे, दात व हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.कच्चे बीट खाण्यामुळे मासिक पाळीसंबधीत तक्रारी दूर होण्यास मदत होते. सेवनाने स्त्रियांमध्ये रक्त व हिमोग्लोबिन वाढते. फॉलिक अॅसिड असल्याने गरोदर स्त्रियांसाठी बीट उपयुक्त आहे. प्रसूतीनंतर आईचे दूध वाढण्यास मदत होते..कर्करोगापासून संरक्षण होते. बीट हे बेटालेन्स रंगद्रव्ये या अँटीऑक्सिडंट्समुळे गडद लाल रंगाचे असते. बेटालेन्स रंगद्रव्यामुळे कर्करोगापासून रक्षण होण्यास मदत होते. शरीरातील विकृत पेशी नष्ट करण्यास मदत होते..तयार होणारे पदार्थबीट हे कमी खर्चात घेता येणारे आणि बाजारात सतत मागणी असलेले पीक आहे. हे पीक साधारण ९० ते १२० दिवसांत तयार होते. पीक उत्पादनाच्या बरोबरीने प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री अशा विविध पूरक क्षेत्रांतही रोजगार निर्मिती शक्य आहे. गावपातळीवर शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसाह्यता गट आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात. बाजारपेठेत बीट ज्यूस, बीट पावडर, बीट चिप्स, लोणचे, जॅम, नैसर्गिक फूड कलर अशा उत्पादनांना वाढती मागणी आहे.- कु. मोनिका गायकवाड,८१८०८९८४६६(एम.टेक. विद्यार्थी, अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.