Power Supply Cut : वीजबिल न भरल्याने ६,००० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Maharashtra Electricity : अमरावती परिमंडळाअंतर्गत २३१ कोटी ५२ लाख वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने मोहीम तीव्र केली आहे.
Electricity
ElectricityAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : अमरावती परिमंडळाअंतर्गत २३१ कोटी ५२ लाख वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने मोहीम तीव्र केली आहे. वीजबिल न भरणाऱ्या सहा हजार १४६ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

परिमंडळाअंतर्गत विविध वर्गवारीतील १५ लाख ग्राहकांना महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. जानेवारी अखेर कृषी ग्राहक, पाणीपुरवठा व पथदिव्यांचे ग्राहक वगळून परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे २३१ कोटी ५२ लाख रुपये वीजबिलाचे थकीत होते.

Electricity
Online Electricity Bill : ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्टवॉच जिंका

आर्थिक समस्या निर्माण झाल्याने महावितरणने वीज बिल वसुली मोहीम अधिक तीव्र केली. थकीत विजबिलामध्ये अमरावती जिल्ह्यातील ११० कोटी ७५ लाखाचा समावेश आहे.

Electricity
Electricity Bill Recovery : थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित: महावितरणकडून कारवाईचा बडगा

२० फेब्रुवारी पर्यंत ३८ कोटी रुपयांचा वीजबिलाचा भरणा करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात १२० कोटी ७७ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी २५ कोटी रुपयांचा वीज बिल भरणा करण्यात आला आहे.

परंतु महिन्याच्या उरलेल्या दहा दिवसात मोठी थकबाकी वसूल करावी लागणार असल्याने महावितरणने वीजबिल वसुली मोहिमेला गती दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com