Power Supply Stopped : अडीच हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Electricity Bills Dues : छत्रपती संभाजीनगर परिमंडल म्हणजेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना अशा दोन जिल्ह्यांत तब्बल अडीचशे कोटींच्या थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे.
Electricity Bill
Electricity BillAgrowon
Published on
Updated on

Jalna News : छत्रपती संभाजीनगर परिमंडल म्हणजेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना अशा दोन जिल्ह्यांत तब्बल अडीचशे कोटींच्या थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. वाढत्या थकबाकीच्या अनुषंगाने महावितरणने धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. अडीच हजारांपेक्षा अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. ही वसुली मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा महावितरणने दिला.

छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील एकूण घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक (आरसीआय) वर्गवारीतील ४ लाख ६५ हजार ९४० ग्राहकांकडे २४९ कोटी ४३ रुपये लाख थकबाकी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील एकूण ४ लाख २३ हजार ८५ घरगुती ग्राहकांकडे २०९ कोटी ३६ लाख रुपये थकले आहेत.

Electricity Bill
Electricity Theft : चुकीच्या वीजदेयकाचा आइस फॅक्टरीचा दावा फेटाळला

३५ हजार २०५ व्यावसायिक ग्राहकांकडे २६ कोटी ७७ लाख रुपये आणि ७ हजार ६५० औद्योगिक ग्राहकांकडे १३ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी झाली. मंडलनिहाय थकबाकीमध्ये छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात १ लाख ३३ हजार २९५ ग्राहकांकडे ६९ कोटी ६१ लाख रुपये तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात २ लाख १ हजार ६४ ग्राहकांकडे ६६ कोटी २९ लाख रुपये थकले आहेत.

जालना मंडलातील १ लाख ३१ हजार ५८१ ग्राहकांकडे ११३ कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणची थकबाकी ही दिवसेंदिवस वाढतच असल्याने थेट वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली.

Electricity Bill
Maharashtra Electricity : वीज वितरण कंपनीला १२ हजारांचा दंड

महावितरणने १ नोव्हेंबरपासून आजपर्यंत तब्बल २ हजार ७४५ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला. त्यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात १२२४ ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्यात आला. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात १२७० आणि जालना मंडलात २५१ ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे.

घरबसल्या भरा रक्कम

वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वीजबिलांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. वीजबिलांचा भरण्यासाठी स्थानिक वीजबिल भरणा केंद्रांसह व घरबसल्या ऑनलाइन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाइट तसेच महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com