Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill Arrears: सांगली जिल्ह्यात वीजबिलांची २५ कोटींची थकबाकी

Unpaid Electricity Bills : सांगली जिल्ह्यात वीजबिल थकबाकीचा आकडा २५ कोटींपर्यंत पोहोचला आहे. महावितरणकडून वसुलीस गती दिली जात असून, थकबाकीदारांवर कारवाईची शक्यता आहे. वाढत्या थकबाकीमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Team Agrowon

Sangli News: सांगली जिल्ह्यात २४ कोटी ९५ लाख रुपयांची विजेची थकबाकी आहे. थकबाकीमुळे गेल्या ३५ दिवसांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १९७३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणने दिली.

वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे ३१० कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यात २४ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीमुळे गेल्या ३५ दिवसांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ५१ हजार ७३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांच्या तपासणीचे काम स्वतंत्र पथकांद्वारे सुरू आहे. थकीत वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत.

पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंते सर्वश्री राजेंद्र पवार (पुणे), स्वप्नील काटकर (कोल्हापूर) व धर्मराज पेठकर (बारामती) उपविभाग व शाखा कार्यालयांना भेटी देऊन थकबाकी वसुलीचा आढावा घेत आहेत.थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे विभागातील थकित रक्कम

पुणे प्रादेशिक विभागात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सद्यःस्थितीत पुणे जिल्हा- १९९ कोटी ९९ लाख रुपये, सातारा- २० कोटी ४० लाख रुपये, सोलापूर- ४४ कोटी ७ लाख रुपये, कोल्हापूर- २० कोटी ८० लाख रुपये आणि सांगली जिल्ह्यात २४ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे.

वीजबिलांच्या थकबाकीमुळे गेल्या ३५ दिवसांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ५१ हजार ७३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्हा- ४२ हजार ७३, सातारा- १९२०, सोलापूर- ४२७९, कोल्हापूर- १४९० आणि सांगली जिल्ह्यातील १९७३ थकबाकीदारांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या

Agriculture Innovation: ‘एचटीबीटी’ला मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा करा

Farmer Protest: कर्जमुक्त होईपर्यंत शेतकरी घर, शेतांवर लावणार काळे झेंडे

Karul Ghat Landslide: मुसळधारेमुळे करूळ घाटात दरड कोसळली

Farm Roads: शेतरस्ते, पाणंद रस्त्यांना मिळणार क्रमांक

SCROLL FOR NEXT