
Sangli News : बिगर शेतीची एक हजार १६ कोटींची थकबाकी वसुल करण्यासाठी जिल्हा बॅँकेने तब्बल ४४८८ थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला. सर्वाधिक ४ हजार ४७ जणांवर १०१ ची कारवाई करण्यात आली. २२९ जणांवर सिक्युरिटायझेशन ॲक्टअंतर्गत कारवाई झाली. या थकबाकीदारांत सहकारी संस्था, व्यक्तिगत कर्जदारांचा समावेश आहे.
मार्चअखेर जवळ आल्याने जिल्हा बॅँकेने वसुली मोहीम जोरदार सुरू केली आहे. शेती व बिगर शेती कर्जाची वसुली जोरात सुरू आहे. जिल्हा बॅँकेच्या सांगलीतील प्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांची टीम सर्व तालुक्यात वसुलीसाठी नेमली आहे.
कर्जमाफीच्या आशेने शेतीकर्जाची वसुली फारशी होताना दिसत नाही. थकबाकीदार शेतकरी कर्ज परतफेड करण्यास टाळाटाळ करत असून कर्जमाफी होईल या आशेने शासनाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. तरीही जिल्हा बॅँकेने सोसायट्यांच्या माध्यमातून शेती कर्जाची वसुली सुरू ठेवली आहे.
जिल्हा बॅँकेने बिगरशेतीसाठी दिलेले कर्जही मोठ्या प्रमाणात थकित आहे. अशा एक हजार १६ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी बॅँकेने तब्बल ४ हजार ४८८ कर्जदारांवर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई केली आहे. यात ४ हजार ४७ कर्जदारांवर १०१ चे दावे दाखल केले आहेत. या कर्जदारांकडे १४८.६९ कोटींची थकबाकी आहे. तसेच १२.५२ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी ३ जणांवर एनसीएलटीमध्ये दावे दाखल केले आहेत.
सेक्युरिटायझेशन ॲक्टअंतर्गत २९९ थकबाकीदारांवर कारवाई केली असून त्यांच्याकडे ५९४.६८ कोटींची थकबाकी आहे. २२७.८० कोटींची वसुलीसाठी २४ जणांवर सहकार न्यायालयात दावे दाखल केले आहेत. ७३.६२ कोटींच्या वसुलीसाठी ८८ जणांवर कलम १३८ अंतर्गत कारवाई केली आहे. ३.८० कोटींच्या वसुलीसाठी मृत सभासदांचे १२४१ वारसांना ‘कलम ९१’ खाली दावा पूर्व नोटीस बजावली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.