jayant patil Agrowon
ॲग्रो विशेष

Election 2024 : ५ टप्प्यात निवडणुका कोणाच्या सोयीसाठी; जयंत पाटलांचा सवाल

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी (ता.१६) लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. महाराष्ट्रात ५ टप्प्यात लोकसभेचं मतदान पार पडणार आहे. परंतु याबद्दल राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

Dhananjay Sanap

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी (ता.१६) लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. महाराष्ट्रात ५ टप्प्यात लोकसभेचं मतदान पार पडणार आहे. परंतु याबद्दल राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे, हे कोणाच्या सोईसाठी केलं आहे. मुळात दोन टप्प्यात मतदान होऊ शकते, हे निवडणूक आयोगाने सांगितले पाहिजे, असं पाटील म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

पुढे पाटील म्हणाले "मुळात देशभरात सात टप्प्यात व महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान घेण्याची गरज नाही, चार ते पाच टप्प्यात हे मतदान प्रक्रिया पार पडली असती. विशेषत महाराष्ट्रात ४८ मतदारसंघ त्यासाठी ५ टप्पे मतदानासाठी काहीच गरज नव्हती. यातून कोणाची सोय करायची आहे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीचा बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण यावरुन तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु आता महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याबद्दल पाटील म्हणाले, "बीड लोकसभा मतदारसंघात काय कारण आवश्यक आहे. आज ज्योती मेटे यांच्यासोबत यावर आम्ही सल्लामसलत केलं आहे. अंतिम निर्णय जाहीर करू. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रपक्ष बोलत आहेत. त्यामुळे आम्ही थांबलो आहोत." असेही जयंत पाटील बोलताना म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत आमचा प्लान बी नाही आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी सकारात्मक आहे. आमचा प्लान एकच आहे. प्रकाश आंबेडकर यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील एकच प्लान आमच्यासाठी ठेवावा असे जयंत पाटील बोलताना सांगितलं.

जयंत पाटील यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, महायुती मधील दोन मित्र पक्ष यांना बाजूला ठेवून भाजपने आधीच जागा वाटप करत यादी जाहीर केली आहे. आम्ही आघाडीचा धर्म पळतो. सर्वांचे वाटप झाल्यावर आम्ही करतो. बाळासाहेब आंबेडकर हे आघाडी सोबत येतील. ते सोबत तोडगा काढतील. संविधान वाचवण्यासाठी सोबत येणं गरजेचं आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT