Lok Sabha Elections : देशात लोकसभा निवडणूकांचा धुरळा ७ टप्प्यात, ४ जूनला निकाल

Chief Election Commissioner Rajeev Kumar : आगामी लोकसभा आणि आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
Local Self Government
Local Self GovernmentAgrowon

Pune News : देशातील १८ व्या लोकसभा निवडणूका ७ टप्प्यात होणार असून ४ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा शनिवारी (ता.१६) निवडणूक आयोगाने केली. ही घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. त्यांनी ही घोषणा दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी लोकसभेच्या ५४३ जागांवर ७ टप्प्यात मतदान होणार असून १९ एप्रिल ते १ जून पर्यंत मतदान होणार आहे. तर निकाल ४ जूनला लागेल, अशी माहिती कुमार यांनी दिली आहे. यामुळे देशात लोकसभा निवडणुकापूर्वी आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळी नव नियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू उपस्थित होते. यावेळी कुमार यांनी, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांच्या नियुक्तीमुळे ही कमिटी पुर्ण झाली असून आमची टीम निवडणुकीसाठी सज्ज आहे. निवडणुक हा देशाचा सण असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. 

टप्पे आणि निवडणूका 

टप्पा १

अधिसूचना २८ मार्च रोजी प्रसिद्ध होईल. ३० मार्च आणि १९ एप्रिल रोजी माघारी घेण्याचा दिवस असेल. बिहारमध्ये याची तारीख २ एप्रिल असेल. तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत.

टप्पा २ 

२८ मार्च रोजी अधिसूचना तर २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 

टप्पा ३ 

७ एप्रिल रोजी अधिसूचना, ७ मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये १२ राज्यांचा सहभाग असेल. ३ नवीन राज्यांमध्ये निवडणुका होतील.

टप्पा ४

१८ एप्रिल रोजी अधिसूचना, १३ मे रोजी मतदान 

टप्पा ५ 

३० मे रोजी मतदान होणार आहे.

टप्पा ६

२५ मे रोजी मतदान

टप्पा ७

७ मे रोजी अधिसूचना, १ जून रोजी मतदान

Local Self Government
Lok Sabha Election : सोलापूर जिल्ह्यात दीड हजार मतदारांसाठी एक केंद्र

महाराष्ट्रात १९ मे ते २० मे दरम्यान मतदान

राज्यात पहिला टप्पा १९ एप्रिल पाच ठिकाणी मतदान 

दुसरा टप्पा २६ एप्रिल आठ ठिकाणी मतदान 

तिसरा टप्पा ७ मे ११ ठिकाणी 

चौथा टप्पा  १३ मे ११ ठिकाणी

पाचवा टप्पा २० मे १३ ठिकाणी मतदार होणार आहे. 

पोट निवडणूक

बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, हिमाचल, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पोट निवडणूक होणार आहे. २६-२६ रिक्त जागा आहेत. तसेच ४ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका आहेत. सिक्कीममध्ये २ जून, ३२ जागा, ओडिशामध्ये २४ जून, १०७ जागा, अरुणाचलमध्ये ६० विधानसभा जागा, आंध्र प्रदेशमध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

१७ व्या लोकसभेचा कार्यकाळ 

तसेच कुमार म्हणाले, "देशाला खऱ्या अर्थाने उत्सवपूर्ण, लोकशाही वातावरण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभांचा कार्यकाळ देखील जून २०२४ मध्ये संपणार आहेत. तर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होतील असेही कुमार म्हणाले. 

Local Self Government
Lok Sabha Election : लोकसभेपूर्वी मोहरी ग्रामपंचायतीने दिला बहिष्काराचा इशारा

९७ कोटी मतदार 

९७ कोटी मतदार असून १०.५ लाख मतदान केंद्रे आहेत. १.५ कोटी मतदान अधिकारी, ५५ लाख ईव्हीएम, ४ लाख वाहने यात वापरली जाणार असल्याचे कुमार यांनी सांगितले. तसेच याआधी ४०० हून अधिक विधानसभा निवडणुका घेतल्या. तर २०१६ मध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका घेतल्याचेही ते म्हणाले. 

फेक न्यूजवर कारवाई

तसेच गेल्या दीड वर्षात ११ निवडणुका झाल्या असून सर्व निवडणूका शांततेत पार पडल्या आहेत. न्यायालयीन खटले, न्यायालयीन टिप्पण्या देखील कमी झाल्या आहेत. फेक न्यूजवर कारवाई करण्याची पद्धत खूप मजबूत करण्यात आली आहे. तसेच गेल्या २ वर्षांत आम्ही ते आणखी मजबूत केले आहे. 

१.८२ कोटी पहिल्यांदाच मतदार

सध्य स्थितीला ९६.८ कोटी मतदार असून यात पुरुष ४९.७ कोटी आणि ४७ कोटी महिला आहेत. यात प्रथमच मतदारांची संख्या १.८२ कोटी असून १८-२९ वयोगटातील मतदार हे १९.७४ कोटी आहेत. यात ८८.४ लाख अपंग, ८२ लाख वयस्क, २.१८ लाख १०० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आणि ४८ हजार ट्रान्सजेंडर आहेत.

महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त

१२ राज्यांमध्ये लिंग गुणोत्तर एक हजाराच्या वर असून महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. १.८९ नवीन मतदारांपैकी ८५ लाख महिला आहेत. १ एप्रिलपूर्वी ५ लाखांहून अधिक लोक मतदार होतील.

घरोघरी जाऊन मतं नोंदवा

८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन मत नोंदवण्यात येणार आहेत. तसेच आपले उमेदवार कोण आहेत याची माहिती मतदाराला त्याच्या मोबाईल क्रमांकावरून मिळू शकते. यासाठी Know your candidate द्वारे पाहू शकता. तसेच गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या उमेदवाराला वर्तमानपत्र आणि टीव्हीवर ३ वेळा याची माहिती द्यावी लागेल. तर पक्षाला दुसरा उमेदवार का मिळाला नाही, याचा खुलासा करावा लागेल अशा सुचना देण्यात आल्या आहेत. 

तक्रार मिळताच १०० मिनिटांत 

तसेच कोणाला तक्रार करायची असल्यास ते सी-व्हिजिल ॲपमध्ये करू शकतात. येथे पैसे किंवा भेटवस्तूंबाबत एका फोटोवरून तक्रार करू दाखल करा. यानंतर १०० मिनिटांत टीम पाठवून तक्रारीचे निराकरण केले जाईल असे कुमार यांनी सांगितले आहे. तसेच हिंसाचार होऊ देऊ नये, अशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या असून पोलिसांना अजामीनपात्र वॉरंट दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य सीमेवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ड्रोनद्वारे तपासणी केली जाईल. 

पैशाचा गैरवापर

निवडणुकीच्या काळात गेल्या ११ वर्षात ३४०० कोटी रुपयांची रोख चलने पकडण्यात आली आहेत. काही राज्यांमध्ये हिंसाचार, पैशाचा गैरवापर या समस्या दिसून आल्या आहेत. पण आता पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com