Seasonal Crops: उन्हाळी हंगामातील पेरण्यांना मागील महिन्यापासून वेग आला असून, पुणे विभागात आतापर्यंत ७७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा काही भागात पाण्याची उपलब्धता तुलनेने कमी असल्याने एकूण पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..कृषी विभागाच्या माहितीनुसार, विभागातील सरासरी ४७ हजार ४८७ हेक्टर क्षेत्रापैकी ३६ हजार ६५५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने उन्हाळी मका, बाजरी आणि भूईमूग या पिकांचा समावेश आहे. मक्याची १९ हजार २३४ हेक्टर, बाजरीची ५ हजार ६३७ हेक्टर, भूईमूगाची ११ हजार ४७३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. याशिवाय मूग (९५ हे.), उडीद (१११ हे.) आणि सोयाबीन (५३ हे.) या पिकांचाही समावेश आहे..Summer Crop Sowing: तीन जिल्ह्यांत २४ हजार८६२ हेक्टरवर पेरणी.गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात चारा टंचाईचा प्रश्न गंभीर बनत असल्याने शेतकरी चारा पिकांकडे वळत आहेत. परिणामी पारंपरिक उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात घट होत असल्याचे चित्र आहे. कमी पावसामुळे अनेक भागात पाणीपातळी घटली असून आगामी काळात पाणीटंचाई वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पुढील पेरण्यांवर होऊ शकतो..दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांची काढणीही अंतिम टप्प्यात आहे. अहमदनगर जिल्ह्यात ज्वारी पिकाची ८५ ते ९० टक्के काढणी पूर्ण झाली असून हरभऱ्याची ९५ टक्के काढणी झाली आहे. गहू काढणी ५० टक्क्यांपर्यंत झाली असून मका पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे..Summer Crop Sowing: मराठवाड्यात ४३ हजार ८४२ हेक्टरवर उन्हाळी पेरणी.उन्हाळी बाजरी व भूईमूग पिकांची वाढ समाधानकारक असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात ज्वारीची ९० टक्के, गव्हाची सुमारे ७० टक्के, तर मक्याची ६० ते ७० टक्के काढणी पूर्ण झाली आहे. हरभऱ्याची काढणी ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, गहू व हरभरा पिकांची सुमारे ९० टक्के काढणी पूर्ण झाली असून मका काढणी सुरू आहे..उन्हाळी हंगामातील मका, बाजरी व भूईमूग पिके सध्या वाढीच्या अवस्थेत असून पिकांची स्थिती एकूणच समाधानकारक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे..जिल्हानिहाय झालेली पेरण्या : (हेक्टरमध्ये)जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्केनगर १५,२१० ६८९५ ४५पुणे २०१७३ ११८४८ ५९सोलापूर १२१०४ १७९११ १४८एकूण ४७,४८७ ३६,६५५ ७७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.