Hingoli Turmeric Market: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये मंगळवारी (ता. ७) हळदीची २२८० क्विंटल आवक झाली. हळदीला प्रति क्विंटल किमान १३१०० ते कमाल १५३०० रुपये, तर सरासरी १४२०० रुपये दर मिळाले. .वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. ७) हळदीची २५०० क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान १३००० ते कमाल १५००० रुपये, तर सरासरी १४००० रुपये दर मिळाले..Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन.हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केटमध्ये मार्च महिन्यात हळदीला प्रति क्विंटल ११५०० ते १३५०० रुपयांदरम्यान दर मिळाले. सध्या हळद काढणी हंगाम सुरू आहे. त्यामुळे हळद मार्केटमध्ये हिंगोली जिल्ह्यासह शेजारील परभणी, नांदेड, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांतून नवीन हळदीची आवक सुरू आहे..दररोज १५०० ते २००० क्विंटल हळदीची आवक होत आहे. वार्षिक हिशेबासाठी २६ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान हळद खरेदी बंद राहिली. सोमवार (ता. ६)पासून पूर्वीप्रमाणेच जाहीर लिलावाद्वारे खरेदी सुरू झाली आहे..Turmeric Procurement: शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने बुलडाण्यात हळद खरेदी.सोमवारी (ता. ६) हळदीची २२५० क्विंटल आवक होती. त्यावेळी प्रतिक्विंटल किमान १२८०० ते कमाल १५००० रुपये, तर सरासरी १३९०० रुपये दर मिळाले. नवीन हळदीची शंभर टक्के आवक सुरू आहे, असे बाजार समितीचे सचिव संपत मुंढे यांनी सांगितले..वसमतमध्ये १३००० ते १५००० रुपये दरवसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे.मंगळवारी (ता.७) हळदीची २५०० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटल किमान १३००० ते कमाल १५००० रुपये दर मिळाले. मार्चमध्ये हळदीला ११००० ते १२००० रुपये दर मिळाले. सोमवार (ता. ६)पासून हळदीच्या दरात २००० ते ३००० रुपयांनी सुधारणा झाली असल्याचे बाजार समितीचे सचिव एस. एन. शिंदे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.