Egg Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Egg Rate : अंडीदरात राज्यात दहा रुपयांची घट

Egg Market Price : शेकडा दर ५०० रुपयांवर; दररोज एक कोटी अंड्यांची मागणी

Team Agrowon

Amravati News : पावसाळ्यात मागणीत वाढ होत असल्यामुळे अंडीदरात तेजी अपेक्षित राहते. या वेळी देखील दर ५०० रुपयांवर स्थिरावले असताना मंगळवारी (ता. २५) या दरात दहा रुपयांची घट नोंदविली गेली. इतर राज्यांतून आवक होणाऱ्या अंड्याचे दर ५०० वरून ४९० रुपयांवर आले आहेत. तर महाराष्ट्रातील दर ५१० रुपयांवरून ५०० रुपयांवर आल्याची माहिती पोल्ट्री व्यावसायिक रवींद्र मेटकर यांनी दिली.

उन्हाळ्यात तापमानात वाढीच्या परिणामी अंड्याची मागणी कमी होत दर दबावात राहतात, असा या क्षेत्रातील उद्योजकांचा दरवर्षीचा अनुभव आहे. यंदा मात्र पहिल्यांदाच तापमानात वाढ झाली असताना अंड्यांच्या मागणीतही त्याच वेळी वाढ झाली.

परिणामी, उन्हाळ्याच्या दिवसात दर ५२० ते ५३० रुपये शेकडा (१०० नग) असे होते. महाराष्ट्राची रोजची अंडी मागणी एक कोटीच्या घरात आहे. या मागणीची पूर्तता राज्यातील व्यावसायिकांना करणे शक्‍य होत नाही.

त्यामुळे देशाच्या इतर भागांतून देखील महाराष्ट्रात आवक होत ही गरज भागविण्यावर भर दिला जातो. पावसाळ्यात मात्र दर तेजीतच राहतात, असा अनुभव आहे. त्यामुळेच मे महिन्यात दर काहीसे दबावात आल्यानंतर जून महिन्यात ते पुन्हा तेजीत आले.

५०० रुपये प्रति शेकडा याप्रमाणे अंड्यांना सरासरी दर मिळत आहे. काही दिवस हा दर ५१० रुपयांवर स्थिरावला होता. आता पुन्हा दरात १० रुपयांची घट नोंदविली गेली आहे. मात्र ही घट अल्पकालीन असून त्यात पुन्हा वाढीचा अंदाज वर्तविला जात आहे.

यापुढील काळात ५५० रुपयांपेक्षा अधिकचा दर अंड्यांना मिळेल, असेही पोल्ट्री क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. महाराष्ट्रात मुख्यत्वे हैदराबाद (तेलंगणा) भागातून अंड्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होते.

दरात तेजी
अंड्याचा उत्पादकता खर्च प्रति नग सरासरी साडेचार रुपये आहे. पोल्ट्री व्यावसायिक पशुखाद्य म्हणून मक्‍याचा वापर करतात. गेल्या हंगामात मक्‍याला १९६० रुपयांचा हमीदर होता. त्याच वेळी खुल्या बाजारात २२०० रुपयांनी मक्‍याचे व्यवहार झाले.

केंद्र सरकारने नुकतीच हमीभावात २०० रुपयांची वाढ केली. परिणामी, हे दर २१६० रुपयांवर पोचले. पोल्ट्री उद्योगाची वाढती मागणी असल्याच्या परिणामी खुल्या बाजारात मका दर पूर्वीच्या २२०० रुपयांवरून आता २५०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्याचा अंड्यांच्या उत्पादकता खर्चावर परिणाम होतो.

अंडी उत्पादकता खर्च साडेचार रुपये असून दर प्रति नग ५ रुपये आहे. ५१० रुपये प्रति शेकडा असा देखील दर अंड्यांना मिळाला आता त्यात १० रुपयांची घट झाली आहे. मक्‍याचे दरही वाढीस लागल्याने उत्पादकता खर्चही वाढतो. यापूर्वी चार ते साडेचार रुपये असा दर मिळत होता. त्यामुळे नुकसान सोसावे लागले.

- रवींद्र मेटकर,
लेअर पोल्ट्री व्यावसायिक, अंजनगावबारी, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr Panjabrao Deshmukh Memorial Award: डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्र्यांना जाहीर

Kharif Onion Cultivation: लेट खरीप कांद्याची लागवड यंदा अडीच लाख हजार हेक्टरवर

APMC Reforms: ‘बाजार व्यवस्थेवर आता सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण’

Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’च्या जमीन खरेदी-विक्रीला स्थगिती

Market Committee Democracy: पणनमंत्र्यांकडील अध्यक्षपद बाजार समित्यांच्या मुळावर: राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT