Turmeric Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Farming : जैविक निविष्ठा वापरातून दर्जेदार हळदीसाठी प्रयत्न

Turmeric Production : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील सुमीत अरुण आपटे गेल्या चार वर्षांपासून हळद लागवड करत आहेत. त्यांनी पीक फेरपालटीवर भर देत उत्पादन वाढीसाठी जमिनीच्या आरोग्यावरही तितकेच लक्ष केंद्रित केले आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Turmeric Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : हळद

शेतकरी : सुमीत अरुण आपटे

गाव : कसबे डिग्रज, ता. मिरज, सांगली.

एकूण शेती : १३ एकर

हळद क्षेत्र : १ एकर (सेलम वाण)

कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील सुमीत अरुण आपटे गेल्या चार वर्षांपासून हळद लागवड करत आहेत. त्यांनी पीक फेरपालटीवर भर देत उत्पादन वाढीसाठी जमिनीच्या आरोग्यावरही तितकेच लक्ष केंद्रित केले आहे.

सुमीत यांची कसबे डिग्रज येथे १३ एकर शेती. सुमीत यांचे सॉफ्टवेअरचे शिक्षण घेतले आहे. गेल्या सहा वर्षांपूर्वी त्यांनी शेतीची सूत्रे हाती घेतली. एकपीक पद्धतीमुळे जमिनीचे आरोग्य ढासळत चालले होते. त्यामुळे त्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याचे ठरविले. गाव परिसरात हळद लागवड चांगली होती.

हळद संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांच्याकडून हळद पिकाचे मार्गदर्शन घेतले. बियाणे, लागवड पद्धती, खत व्यवस्थापन आदी बाबींचा बारकाईने अभ्यास सुरु केला. हळद पिकात रासायनिक खतांऐवजी जैविक आणि सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला. यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत मिळाली, असे सुमीत आपटे सांगतात.

लागवड नियोजन

पूर्वी लागवडीपूर्वी जमिनीची ट्रॅक्टरच्या साह्याने खोल नांगरट केली जायची. ती त्यांनी बंद केली. ऊस काढणी पूर्ण झाल्यानंतर कुट्टी केली. तसेच विविध पिकांचे अवशेष रोटरच्या साह्याने मातीआड करण्यावर भर दिला.

लागवडीसाठी चार फुटी सरीचा पर्याय निवडला. लागवडीपूर्वी दोन ट्रॉली शेणखत, मासळी खताच्या मात्रा शेतात दिल्या.

दरवर्षी साधारपणे १५ मेच्या दरम्यान लागवड केली जाते. लागवडीसाठी सेलम जातीचे बेणे वापरतात. त्यासाठी मागील वर्षीचे मातृकंद बाजूला काढून ठेवले जातात.

लागवडीपूर्वी जैविक आणि रासायनिक बेणेप्रक्रिया करण्यावर भर दिला जातो.

लागवडीसाठी एकरी १२ क्विंटल बेणे लागते.

यावर्षी देखील घरचे बेणे वापरले आहे. पुढील दोन वर्ष घरचेच बेणे वापरणार आहे. त्यानंतर नवीन बेणे खरेदी करून त्याची लागवड करणार असल्याचे सुमीत सांगतात.

खत व्यवस्थापन

दरवर्षी माती परिक्षण केले जाते. त्यानुसार खतांचा संतुलित वापर करण्यावर भर दिला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने जिवाणू खतांचा वापर केला जातो. लागवड केल्याच्या एक महिन्यानंतर नीम पेंड, करंजी, सरकी, सूर्यफूल पेंड यांचे मिश्रण करून वापरले जाते.

मागील कामकाज

यावर्षी अति पावसामुळे बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून आला. जमिनीतून व फवारणीद्वारे ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस यांचा वापर केला.

पावसाचे अतिरिक्त पाणी त्वरित पिकाबाहेर जाण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला. जेणेकरून कंदकूज आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव रोखला जाईल.

हळद पिकाची गरज आणि वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर भर देण्यात आला. मागील वर्षीपासून ठिबक सिंचनाचा अवलंब केला आहे.

योग्य प्रमाणात फुटवे तयार होण्यासाठी शिफारशीत घटकांच्या मात्रा दिल्या. यामुळे अपेक्षित फुटवे मिळण्यास मदत झाली.

जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी जीवामृत, वेस्ट डी कंम्पोजर इत्यादींच्या वापरावर अधिक भर देण्यात आला.

आगामी नियोजन

सध्या हळद पीक कंद पोसावण्याच्या अवस्थेत आहे. आगामी काळात हळकुंडांची जाडी व लांबी वाढण्यासाठी सेंद्रिय खत, स्लरी, नीम, करंजी, सरकी पेंडीच्या वापरावर भर दिला जाईल.

एनपीके उपलब्ध करणाऱ्या जिवाणू खतांच्या वापरावर भर दिला जाईल.

वाफसा स्थिती आणि पिकाची गरज या बाबींचा अंदाज घेऊन सिंचन केले जाईल.

पिकाचे कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी वेळोवेळी निरिक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार पीक संरक्षणासाठी उपाय केले जातील. रासायनिक उपाय करणे कटाक्षाने टाळले जाते. त्याऐवजी जैविक निविष्ठांच्या वापरावर भर दिला जाईल, असे सुमीत सांगतात.

आगामी नियोजन

सध्या हळद पीक कंद पोसावण्याच्या अवस्थेत आहे. आगामी काळात हळकुंडांची जाडी व लांबी वाढण्यासाठी सेंद्रिय खत, स्लरी, नीम, करंजी, सरकी पेंडीच्या वापरावर भर दिला जाईल.

एनपीके उपलब्ध करणाऱ्या जिवाणू खतांच्या वापरावर भर दिला जाईल.

वाफसा स्थिती आणि पिकाची गरज या बाबींचा अंदाज घेऊन सिंचन केले जाईल.

पिकाचे कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी वेळोवेळी निरिक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार पीक संरक्षणासाठी उपाय केले जातील. रासायनिक उपाय करणे कटाक्षाने टाळले जाते. त्याऐवजी जैविक निविष्ठांच्या वापरावर भर दिला जाईल, असे सुमीत सांगतात.

- सुमीत आपटे, ९९२२४३९९९८

(शब्दांकन : अभिजित डाके)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Administration Plan: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज

Paddy Prices Drop: मळणीच्या तोंडावर व्यापाऱ्यांचा डाव

Shaktipeeth Highway Project: ‘शक्तिपीठ’ला पाठिंबा, पण मोबदला दहा पट द्या !

Kharif Sowing Planning: वर्ध्यात ४.१९ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन

Shirapur Irrigation Project: शिरापूर योजनेच्या कामाची गती संथ

SCROLL FOR NEXT