
Akola News : यंदा सलग दीड ते दोन महिने पाऊस, पावसाचे वातावरण राहिल्याचा फटका हळदीच्या पिकाला बसला आहे. त्याचे दुष्परिणाम आता समोर आले असून, हळद उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. काही ठिकाणी मूळकुज, कंदसड व कंदमाशीचा प्रकोप झाला असून, यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील हळद उत्पादन पट्ट्यात २० ते ५० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट होईल, असे जाणकार हळद उत्पादक शेतकरी सांगत आहेत.
खरीप हंगामात राज्यात हळदीचे लागवड क्षेत्र दरवर्षी वाढते आहे. पश्चिम विदर्भात वाशीम जिल्हा या पिकात अग्रेसर आहे. तेथे सुमारे ४ ते ५ हजार हेक्टरपर्यंत लागवड पोचलेली आहे. या जिल्ह्यात हळदीची उत्पादकताही चांगली आहे. यंदा जूनमध्ये हळदीची लागवड झाल्यानंतर उगवण चांगली झाली होती. सुरुवातीला खतमात्रा, आंतरमशागतीचे काम झाले. मात्र नंतरच्या काळात सुमारे दीड ते दोन महिने पाऊस, पावसाचे वातावरण होते. पिकाला पुरेसा सूर्यप्रकाशही मिळू शकला नाही. पिकाला वाफसा न मिळाल्याने मुळांची वाढ झाली नाही. जी वाढली त्यावर बुरशीचा प्रादुर्भाव झाला. ही बाब लक्षात आली तेव्हा नुकसानीचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले होते.
मागील १५ ते २० वर्षांत पहिल्यांत अशा प्रकारे सलग पाऊस झाला. पावसामुळे पिकात या काळात कुठलीही आंतरमशागत होऊ शकली नाही. पिकाच्या मुळांना हवा मिळाली नाही. परिणामी, जमिनीच्या वरच्या भागात वाढ झाली पण जमिनीत कंदाचे नुकसान होत गेले. काही ठिकाणी मूळकुज तर काही ठिकाणी कंदसड, कंदमाशीचा प्रादुर्भाव झाला आहे.
उत्पादकता घटणार
वाशीम जिल्ह्यात अनेक शेतकरी हळदीचे एकरी २५ ते ४० क्विंटलदरम्यान (वाळविलेले) उत्पादन सर्रास घेत असतात. यंदा या प्रादुर्भावाचा मोठा फटका बसणार आहे. बऱ्याच प्लॉटमध्ये ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. पिकासाठी उत्पादन खर्च आधीच वाढलेला आहे. त्यात आता उत्पादकता घटली तर नुकसान सहन करावे लागणार असल्याने हळद उत्पादक आता चिंतातुर झाले आहेत. वरील प्रादुर्भावावर आता उपाययोजना करून फारसा फरक पडण्यासारखी स्थिती नाही, असेही शेतकरी सांगत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.