Farmer Problems: उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतीसाठी वरदायिनी ठरणाऱ्या शिरापूर उपसा सिंचन योजनेचे काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडले आहे. कामाची गती अत्यंत संथ असल्याने ऐन उन्हाळ्यात शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याच्या आवर्तनापासून वंचित राहिले असून, संतप्त प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला आहे..वडाळा-रानमसले शिवारात यशराज इंटरप्रायझेस या कंपनीकडे या कामाचा ठेका देण्यात आला आहे. येथे पाणी वितरणासाठी मायनर क्रमांक ३ व ४ वर एकूण ६५ आउटलेट प्रस्तावित आहेत. मात्र, सद्यस्थितीत केवळ १५ आउटलेटचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ५० कामे अद्याप अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी पाइपलाइन जमिनीत टाकली असली, तरी चारी उघड्या अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे..Kharamboli Canal Project: खारआंबोली कालव्याला गती.काम सुरू असताना फळबागा आणि उभी पिके वाचवण्यासाठी ठेकेदाराने शेतकऱ्यांना स्वतः पाइपलाइन पुरून घेण्यास सांगितले होते. यावेळी मशिनरीचा (जेसीबी) खर्च देण्याचे आश्वासन दिले गेले होते..Pipeline Irrigation Policy: शेतीला बंदिस्त पाइपद्वारे पाणीपुरवठ्याचे धोरण.मात्र, शेतकऱ्यांनी स्वखर्चाने काम पूर्ण करूनही अद्याप त्यांना खर्चाची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार शेतकरी घनश्याम गरड यांनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण आर्थिक फटका बसला आहे..“रानमसले-वडाळा हद्दीत मायनर क्रमांक ३ व ४ चे काम सुरू आहे. आउटलेटची कामे लवकरच पूर्ण केली जातील. मात्र, कामातील संथपणामुळे संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.”-ऐश्वर्या उंबरजे, शाखा अभियंता, उजनी कालवा विभाग क्र. १६..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.