IAS Kumar Ashirwad Agrowon
ॲग्रो विशेष

Collector Kumar Ashirwad : ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

Mazi Ladki Bahin Yojana : ‘‘राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रूपरेषा ठरविण्यात येत आहे.

Team Agrowon

Solapur News : ‘‘राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रूपरेषा ठरविण्यात येत आहे.

ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद, सोलापूर शहरासाठी सोलापूर महापालिका, तर नगरपालिका क्षेत्रासाठी सर्व संबंधित नगरपालिकांनी या योजनेत जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थी सहभागी होण्यासाठी जनजागृती, अर्ज दाखल करण्याची माहिती तसेच कागदपत्रांच्या अनुषंगाने संबंधित लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी रूपरेषा तयार करण्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत श्री. आशीर्वाद बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आदी उपस्थित होते.

श्री. आशीर्वाद म्हणाले, ‘‘ही योजना महत्त्वपूर्ण असून, याचा लाभ १५ ऑगस्टपासून देण्यास सुरुवात होईल. ग्रामीण भागातील महिलांचे ऑनलाइन व ऑफलाइन अर्जासाठी जिल्हा परिषद, सोलापूर शहरासाठी सोलापूर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हा नगरपालिका प्रशासनाने नियोजन करून त्याची माहिती तत्काळ प्रशासनाला सादर करावी.``

‘तालुकास्तरावर शिबिरे घ्यावीत’

महिलांना आवश्यक असलेली कागदपत्रे प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. ई केवायसी महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर करण्याबाबत नियोजन करावे. यासाठी मंडळ व तालुकास्तरावर शिबिरे घेण्यासाठी नियोजन करावे, ज्यांचे बँक खाते नाही, त्यांना लवकर बँक खाते काढून देण्याची कार्यवाही करावी. तसेच ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही, त्यांचेही आधार कार्ड लिंक करून घ्यावे, एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना आशीर्वाद यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गव्हाच्या दरात चढ-उतार, ज्वारीच्या दरात वाढ, शेवग्याच्या दरात बदल, टोमॅटोच्या आवकेत घट तर डाळिंबाचे दर टिकून

Water Storage: गिरणा धरण १०० टक्के भरले; रब्बी हंगामातील पिकांना दिलासा

Farmers Foreign Study Tour: राज्यातील १८० शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी, ४ कोटी निधी मंजूर

Onion Planting Preparations: खानदेशात रब्बी, उन्हाळ कांदा रोपवाटिकांच्या कामांना वेग

Maharashtra Weather Alert: कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; काही भागात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT