IAS Kumar Ashirwad : ‘शासन आपल्या दारी’साठी यंत्रणांनी जबाबदारी पार पाडावी

Shasan Aaplya Dari : सोलापुर जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलेली जबाबदारी परस्परात समन्वय ठेवून पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
IAS Kumar Ashirwad
IAS Kumar AshirwadAgrowon

Solapur News : राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबवले जात आहे. याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २७ किंवा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलेली जबाबदारी परस्परात समन्वय ठेवून पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवारी (ता. १३) केले.

IAS Kumar Ashirwad
Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’ हा राज्य सरकारचा इव्हेंट

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रम पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी रोहयो चारूशीला देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, की राज्य शासनाकडून १५ एप्रिल २३ पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने पंढरपूर येथे हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमाची विविध शासकीय विभागाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली असून, मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे.

IAS Kumar Ashirwad
Padalse Project : ‘पाडळसे’चा समावेश केंद्राच्या योजनेत लवकरच शक्य

त्याच लाभार्थ्यांची निवड पंढरपूर येथील कार्यक्रमासाठी त्या त्या विभाग प्रमुखांनी करून त्याची यादी प्रशासनाला सादर करावी. या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून ४० ते ५० हजार लाभार्थी आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून किमान ४०० ते ५०० बसेसची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

विविध विभागांचे स्टॉल्स

उपविभागीय अधिकारी पंढरपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पंढरपूर व तहसीलदार पंढरपूर यांनी या कार्यक्रमासाठी वाखरी किंवा ६५ एकर जागेची पाहणी करून पन्नास हजार लाभार्थी व त्यांना घेऊन येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था या अनुषंगाने माहिती प्रशासनाला त्वरित सादर करावी.

कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध विभागांचे ५० स्टॉल लावले जाणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने २०, नगरपालिका ५, कृषी विभाग ५, पोलिस विभाग २ आरटीओ २ एमएसईबी २, कौशल्य विकास २, सिव्हिल हॉस्पिटल २ व अन्य विभागाचे प्रत्येकी एक स्टॉल लावावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com