Weather Effect Crop agrowon
ॲग्रो विशेष

Weather Effect Crop : कोंदट हवामानाचा पिकांवर परिणाम, फ्लॉवर, टोमॅटो, ऊस कुजण्याच्या स्थितीत

Crop Damage : विचित्र वातावरणामुळे रब्बी पिकांसह ऊस, भाजीपाला, द्राक्ष, हळद, केळी, फुलशेती, पालेभाज्या या पिकांना पावसाचा फटका बसत आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Tomato Crop Damage : कोल्हापूर जिल्ह्यात सतत होत असलेल्या पाऊस यानंतर अचानक दोन दिवस पडलेलं ऊन पुन्हा आता पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेती पिकाच्या मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. विचित्र वातावरणामुळे रब्बी पिकांसह ऊस, भाजीपाला, द्राक्ष, हळद, केळी, फुलशेती, पालेभाज्या या पिकांना पावसाचा फटका बसत आहे.

सतत पाऊस आणि उन्हामुळे हुमणी, गोगलगाय, पाने खाणाऱ्या अळ्याची वाढ झाल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे.

तसेच सखल भागात शेतातील पाणीच हटेना त्यामुळे सर्वच पिकांची मुळे कुजत आहेत. माळभागात जमिनीतून पाण्याचा पाझर लागल्याने पिकांचे नुकसान होत आहे. ऊन-पावसामुळे भाजीपाला पिकावर करप्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे झाडे खराब होवून पिकाचे उत्पादनावर परिणाम झाला आहे. फ्लॉवर, टोमेटो, ढोबळी मिरची, वेलवर्गीय भाजीपाल्यावर करप्या वाढला आहे.

वाढलेल्या उसात हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे ऊस वाळत आहे, वाढ खुंटली आहे. हवामानामुळे तांबेरा वाढला आहे.

काही महिने सणांची पर्वणी असल्यामुळे फुल शेतीची लागण झाली आहे. मात्र संततधार पावसामुळे फुलात पाणी साचून फुले कुजत आहेत. भिजलेली फुले बाजारपेठेत खरेदी केली जात नाहीत. नवीन लागण केलेल्या झाडे अतिपाण्यामुळे खराब होत आहेत. केळीच्या झाडांची पाने फाटली आहे.

कोंदट वातावरणामुळे ऊसावर तांबेरा व लागणीवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे. सोयाबीनवर किडीचा पाने खाणारी अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा परिणाम होत आहे. घात नसल्याने फवारणी घेण्यावर बंधन येत आहे. जिथे ओढ्याकाठी तण आहे तिथे पाणी साठल्याने भाजीपाला पिकात गोगलगायचा प्रादुर्भाव झाला आहे. काही पिकांचे थेट नुकसान झाले नसले तरी उत्पादन खर्चात वाढ होते. उपाययोजनेसाठी कृषी सहाय्यकांमार्फत माहिती देणे सुरु असल्याचे कृषी पर्यवेक्षक संजय सुतार यांनी माहिती दिली.

संततधार पाऊस व ऊन पावसाच्या लपंडावामुळे लागण केलेल्या फ्लॉवरवर करप्या आला आहे. त्यामुळे पाने खराब होत आहेत. तसेच टोमॅटोचा फड जुना आहे, तर दुसरा आता सुरू झालेला आहे. प्रतिकूल हवामानानुळे जुना फड वाळतच आहे. नवीन फडातील झाडांवर करप्या आला आहे. त्यामुळे झाडे खराब होत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT