Tourism Agrowon
ॲग्रो विशेष

Nature Tourism : जंगल सफारी, खाडी पर्यटनातून आर्थिक समृद्धी

Wildlife Adventure : जंगलसफर, खाडी पर्यटनातून आर्थिक समृद्धी साधता येते हे वेलदूर (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथील रश्मी डांगे आणि त्यांचे पती रवींद्र डांगे यांनी दाखवून दिले आहे. या दांपत्याने दाभोळ खाडीत फेरीबोटीमधून पर्यटकांना सफर घडवून आणत वर्षाला दीड लाखाचे उत्पन्न मिळवत आहेत.

राजेश कळंबटे 

Economic Growth : वेलदूर येथे राहणारे डांगे कुटुंबीय हे मुळातच मच्छीमार समाजातील. समुद्राशी त्यांचा लहानपणापासूनच संबंध. पारंपरिक व्यवसायापलीकडे जाऊन काही करण्याची इच्छा सौ. डांगे यांची होती. त्यासाठी तीन वर्षांपूर्वी डांगे पती-पत्नीने फेरीबोट संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या दोन वर्षांत त्यांना तेवढा प्रतिसाद लाभला नाही; मात्र गतवर्षी समुद्र सफरीसाठी २०२२ मध्ये दहा लाख रुपये खर्च करून नवीन फायबर बोट विकत घेतली. याकरिता पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रातून कर्ज घेतले. ग्रामसंघातून १ लाख ३० हजार रुपयांमधून उपजीविका निधी घेतला.

नवीन सुसज्ज नौकेतून सी-व्ह्यू सागरी पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे. एक तासाच्या सफरीमध्ये गोपाळगड किल्ला, लाइटहाउस, भारती शिपयार्ड, दाभोळ बंदर अशी विविध ठिकाणे पर्यटकांना त्यांच्या सफारीतून पाहायला मिळतात. सायंकाळी समुद्रात मावळत्या सूर्याचा आनंद घेता येतो.

याकरिता प्रतिव्यक्ती ३०० रुपये ते आकारतात. दाभोळ ते वेलदूर अशी ही सफर घडवली जाते. दाभोळ खाडीत सकाळच्या सत्रात डॉल्फिन पाहायला मिळतात. वेलदूर येथील खाडी सफरीचे हे मोठे आकर्षण ठरत आहे. सध्या वर्षाला ५००हून अधिक पर्यटक याचा लाभ घेतात. त्यामधून सुमारे दीड लाखाची उलाढाल होते. हा पर्यटन व्यवसाय सुरू करताना महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डासह अन्य आवश्यक परवानग्या त्यांनी घेतल्या आहेत. जळगाव येथे झालेल्या लखपती दीदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौ. डांगे यांच्याशी संवाद साधला होता.

तिसरी हाउसबोट दाखल

पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे डांगे यांनी नुकतीच तिसरी हाउसबोट विकत घेतली. या बोटीमध्ये दोन कुटुंबांकरिताची निवास व्यवस्था आहे. एक रात्र खाडीतच राहण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो. दाभोळ खाडीतील बॅकवॉटरमध्ये ती उभी करून रात्रभर तिथेच ठेवण्यात येते.

डिसेंबर ते मे या कालावधीत दाभोळ खाडीत पर्यटकांना ही सफर घडवून आणली जाते. नवीन वर्षात व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी केरळ येथील हाउसबोट आणण्याचा मानस आहे, तसेच वाशिष्ठी खाडीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी दाभोळ ते चिपळूण अशी सफर आयोजित केली जाते. त्यामध्ये सात जणांना नौकेतून फिरविण्यात येते.
रवींद्र डांगे, वेलदूर, ९४२०१५८१५९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Drone: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी ड्रोन हाताळणीचा अनुभव

Safflower Sowing: करडईच्या पेरणी क्षेत्रात घट

Soybean Market: सोयाबीनचे ७ कोटी ७१ लाख ७० हजार रुपयांचे चुकारे अदा

Sugarcane Farmer Issues: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ

Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT