Agricultural Tourism : कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला संधी

Employment Opportunity : सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथे अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे सुरू झालेली असून, या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते.
Agro Tourism
Agro TourismAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथे अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे सुरू झालेली असून, या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महसूल तथा जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांनी केले.

कामती (ता. मोहोळ) येथील सिनाई कृषी पर्यटन केंद्र येथे आयोजित पर्यटन चर्चासत्रात उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर मार्गदर्शन करत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी किरण जमदाडे यांच्यासह अन्य कृषी पर्यटन केंद्राचे संचालक उपस्थित होते.

Agro Tourism
Agri Tourism : उजाड माळरानावर बहरले कृषी पर्यटन केंद्र

श्री. नाटेकर म्हणाले, जिल्ह्यात कृषी प्रयत्नाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकते यासाठी योग्य नियोजन व प्रसिद्धी मोहीम राबविल्यास कृषी पर्यटनाला चालना मिळून, यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते.

शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊ शकतो, यासाठी एमटीडीसी आणि सांस्कृतिक विभागाद्वारे उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती, अनुदान व योजना प्राप्त करण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा भरावा, याबद्दलची माहिती प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांपर्यंत तसेच पर्यटन केंद्र चालकापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. सन २०१६ मध्ये सुरू झालेल्या कृषी पर्यटन धोरणात २०२४ मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना विविध अनुदान आणि सहाय्य मिळवून देण्यासाठी अनेक योजना समाविष्ट आहेत.

Agro Tourism
Agriculture Tourism : गावच चालवतंय कृषी पर्यटन केंद्र

प्रत्येक वर्षी लाखो भाविक जिल्ह्यात येतात, या भाविकांच्या संख्येचा वापर करून स्थानिक व्यवसायाला खूप मोठा वाव मिळेल, असेही त्यांनी सांगितले. प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार जमदाडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी सिनाई कृषी पर्यटन केंद्राचे संचालक लहू आवताडे यांनी प्रास्ताविक केले. अंकुश आवताडे यांनी आभार मानले.

कृषी पर्यटन केंद्रचालकांना एकत्र आणणार

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पर्यटनासाठी आम्ही प्रोत्साहन देणार आहोत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय उत्तम ठरु शकतो. शेतकऱ्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. लवकरच जिल्ह्यातील सर्व कृषी पर्यटन केंद्रांची एक स्वतंत्र यादी तयार करून त्याद्वारे सर्व कृषी पर्यटन केंद्र चालकांना एकत्र आणून आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी श्री. नाटेकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com