Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Economic Dilemma : कापूस, सोयाबीन उत्पादकांची आर्थिक कोंडी

Market Update : सद्यःस्थितीत कापसाचे दर सहा हजार, तर सोयाबीनचे दर ४ हजार ३०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

Team Agrowon

Yavatmal News : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानला जाणाऱ्या पिकांचे दर सातत्याने खाली येत आहेत. कापूस व सोयाबीनच्या दरातही घसरण सुरूच आहे. सद्यःस्थितीत कापसाचे दर सहा हजार, तर सोयाबीनचे दर ४ हजार ३०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

कापूस व सोयाबीन हे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. या पिकांवरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे नियोजन असते. यंदा दर घसरत चालल्याने शेतकऱ्यांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामादरम्यान अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले.

अतिपावसामुळे कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांना फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही यंदा निघणार की नाही, याची भीती शेतकऱ्यांना होती. शेतकऱ्यांनी पावसातून पीक वाचविले. पीक काढणीच्या वेळी अवेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या घरात येणारे पीक मातीमोल केले.

दरम्यान, यंदा सोयाबीनला सुरवातीला चांगले दर मिळाले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दर सातत्याने घसरत चालले आहेत. यंदा कापूस उत्पादकांवरच आर्थिक संकट कोसळले आहे. शासकीय कापूस खरेदी सुरू न झाल्याने खासगी बाजारात कापसाचे दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सरकी, रुई व धाग्याचे दर घसरले आहेत. त्याचा परिणाम कापसाच्या दरावर झालेला आहे.

सात हजार २०० वर गेलेले कापसाचे दर सध्या सहा हजारांवरच आलेले आहेत. तशीच परिस्थिती सोयाबीनची आहे. सोयाबीनचे दर ६ हजार ५०० रुपयांच्या जवळपास गेले होते. आता ४ हजार ३०० रुपयांवर दर आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

कापूस खंडीचे दरही ४२ हजारांपर्यंत खाली

सध्या शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीनची विक्री थांबविली आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची आशा असल्याने त्यांनी कापूस व सोयाबीन घरातच ठेवला आहे. कापसाचे दर सरकी व रुई यावरच अवलंबून असतात. हंगामाच्या सुरवातीला कापूस खंडीचे दर ६५ हजार रुपयांवर होते. त्यात मोठी घसरण झालेली आहे. खंडीचे दर ४२ हजार रुपयांपर्यंत कोसळले आहेत. त्याचा परिणाम आता कापसाच्या दरावर झालेला दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT