Agricultural Commodity Market : कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी

Market Update : ६ ते १२ जानेवारी २०२४ या आठवड्यातील शेतीमालाच्या किंमतीमधील चढ-उतार आहेत त्याबद्दलची माहिती पाहूयात.
Market Update
Market UpdateAgrowon

Future Rate of Agriculture Commodity Market :

फ्यूचर्स किमती : सप्ताह ६ ते १२ जानेवारी २०२४

शेतीमालाच्या किमतींमध्ये मे ते डिसेंबर या कालावधीत जास्त चढ-उतार दिसून येतात. या वर्षी तोच अनुभव आला. हळदीच्या किमती मे महिन्यातील रु. ७,००० पासून ऑगस्ट महिन्यात रु. १५,००० पर्यंत चढल्या. त्यानंतर आजपर्यंत त्या रु. १३,००० ते रु. १५,००० या दरम्यान राहिल्या आहेत.

हरभऱ्याच्या किमतीसुद्धा रु. ४,८०० वरून नोव्हेंबरपर्यंत रु. ६,२०० पर्यंत वाढल्या. सध्या त्या उतरत रु. ५,६०० वर आल्या आहेत. तुरीच्या किमती मे महिन्यातील रु. ८,००० वरून नोव्हेंबरमध्ये रु. ११,००० पर्यंत वाढल्या; आता त्या परत रु. ८,३०० वर आल्या आहेत. कांद्याच्या किमती मेमध्ये रु. ८०० होत्या. त्यानंतर वाढत वाढत त्या नोव्हेंबरमध्ये रु. ४,४०० वर गेल्या.

खरिपाचे पुरेसे उत्पादन झाले नसल्याने त्या डिसेंबरमध्येही याच पातळीवर राहिल्या. आता त्या उशिराच्या खरीप उत्पादनाच्या अपेक्षेने उतरू लागल्या आहेत. सध्या त्या रु. १,७०० च्या आसपास आहेत. टोमॅटोची सुद्धा हीच स्थिती होती. मेमधील रु. ६७० वरून त्या ऑगस्टमध्ये रु. ८,५०० वर गेल्या; त्यानंतर त्या पुढील महिन्यात झपाट्याने उतरून रु. ३६० वर आल्या.

आता त्या रु. २,००० वर आल्या आहेत. या सर्व किमती देशातील पुरवठा व त्याच्या अंदाजावर अवलंबून असतात. याशिवाय सोयाबीन व कापूस यांनीसुद्धा असेच चढ-उतार अनुभवले. अर्थात, त्यास, देशातील परिस्थिती शिवाय आंतरराष्ट्रीय किमतीसुद्धा कारणीभूत होत्या. भारतातील व आंतरराष्ट्रीय किमती या पिकांसाठी साधारणतः समांतर असतात. १२ जानेवारी २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

Market Update
Cotton Rate : अपेक्षित भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस ठेवलाय घरात

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव या सप्ताहात रु. ५५,३०० वर आले आहेत. मार्च फ्यूचर्स भाव रु. ०.८ टक्क्याने घसरून रु. ५७,१६० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.४ टक्क्यांनी अधिक आहेत

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात रु. १,३८६ वर आले आहेत. फेब्रुवारी भाव रु. १,५३० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५६० वर कायम आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १२.६ टक्क्यांनी अधिक आहेत. हेजिंग करण्यासाठी या भावांचा विचार करावा. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट भाव यापेक्षा कमी आहेत; मात्र फेब्रुवारी व एप्रिल भाव यापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात ४.७ टक्क्यांनी वाढून रु. २,२५० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (फेब्रुवारी) किमती रु. २,२६८ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. २,२९४ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.६ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती १.३ टक्क्याने घसरून रु. १२,८८८ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. १२,९३८ वर आल्या आहेत. जून किमती रु. १३,०५६ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.३ टक्क्याने जास्त आहेत.

Market Update
Agriculture Commodity Market : कमोडिटी बाजार पुन्हा मंदीच्या विळख्यात

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात ०.९ टक्क्याने घसरून रु. ५,६०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) ०.६ टक्क्याने वाढून रु. ८,८५० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) या सप्ताहात ०.५ टक्क्याने वाढून रु. ४,९२४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) या सप्ताहात ०.७ टक्क्याने वाढून रु. ८,४३३ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. गेल्या दोन महिन्यांत तुरीच्या किमती वाढत होत्या; मात्र त्या सध्या कमी होत आहेत. तुरीचा हंगाम सुरू झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात आवक सर्वाधिक असते.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,७०७ होती; या सप्ताहात येथील किंमत रु. १,६८२ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. २,००० वर आली होती. या सप्ताहात ती रु. १,५०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची

किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो);

कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com