Papaya  Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Cultivation : खानदेशात अर्ली पपई लागवड सुरूच

Papaya Production : अर्ली पपई लागवड जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाली आहे. १५ नंबर वाणाच्या पपईची लागवड जानेवारी, फेब्रुवारीत करावी लागते. यामुळे शेतकरी मागील महिन्यापासूनच लागवड करीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात आगाप किंवा अर्ली पपई लागवड सुरूच आहे. लागवडीसाठी शेतकरी १५ नंबर प्रकारच्या वाणास पसंती देत आहेत. नियमित किंवा हंगामातील लागवड मार्चच्या मध्यात सुरू होईल, असे चित्र आहे.

अर्ली पपई लागवड जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाली आहे. १५ नंबर वाणाच्या पपईची लागवड जानेवारी, फेब्रुवारीत करावी लागते. यामुळे शेतकरी मागील महिन्यापासूनच लागवड करीत आहेत. कारण या वाणाचे उत्पादन रखडत सुरू असते.

तसेच सुरुवातीला चांगले दर मिळतात, असा विचार करूनही लागवडीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. १५ नंबर पपईला सध्या उठाव आहे. जागेवर नऊ रुपये प्रतिकिलोचा दर या आठवड्यात मिळत आहे. यामुळेदेखील शेतकऱ्यांनी या वाणाच्या लागवडीचे नियोजन मागील पाच ते सहा दिवसांत केले आहे.

खानदेशात यंदा डिसेंबर व जानेवारीत पपईचे दर दबावात होते. डिसेंबरमध्ये जागेवर चार रुपये प्रतिकिलो सरासरी दर मिळाला. तर जानेवारीत अडीच रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळाला. दर कमी होते. तरीदेखील अनेकांनी लागवडीचे धाडस जानेवारीत केले. परंतु या महिन्यात दरात हळूहळू सुधारणा झाली आणि लागवडीलाही वेग येत आहे.

पपईची लागवड खानदेशात सर्वाधिक नंदुरबारात केली जाते. सरत्या हंगामात नंदुरबारात पाच हजार २०० हेक्टरवर पपई पीक होते. जळगाव जिल्ह्यात सुमारे १२०० हेक्टरवर, तर धुळ्यात सुमारे ९०० हेक्टरवर पपई पीक होते. यंदा लागवड कमी होईल, असे चित्र आहे. कारण पपईचे पीक परवडलेले नाही.

लागवड स्थिर राहणार

खानदेशात यंदा पपईची लागवड कमी होईल, असे चित्र मागील महिन्यात होते. परंतु यंदाची लागवडही स्थिर राहू शकते. कारण अनेक कापूस उत्पादक पपईकडे वळले आहेत . कापूस पीक परवडत नाही. त्यात मोठी मजुरी लागते. तसेच दरही अपेक्षित नाहीत. तोटा येत आहे. यामुळे कापसाखालील क्षेत्र कमी करून पपई व अन्य पिकांची लागवड करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. यामुळे खानदेशात २०२४ च्या हंगामातही पपईची सात हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी स्थिती तयार झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT