E Peek Pahani Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : रब्बीतील १ लाख ३० हजार हेक्टरवर ई-पीकपाहणी

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२३-२४) रब्बी हंगामात डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील ५९ हजार ९३३ शेतकरी (२१.४४ टक्के) खातेदारांच्या १ लाख ३० हजार २५२ हेक्टरवरील (४८.१० टक्के) ई-पीकपाहणी झाली आहे. आजवर झालेल्या रब्बी पेरणी क्षेत्रापैकी ९४ हजार ७४९ हेक्टरवरील पिकांची तर एकूण शेतकरी खातेदारांपैकी ५ लाख ३९९ शेतकरी खातेदारांची ई-पीकपाहणी राहिली आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांत एकूण ५ लाख ६० हजार ३३२ शेतकरी खातेदार आहेत. शेती खात्यांचे एकूण क्षेत्रफळ ६ लाख ७ हजार ५५८ हेक्टर आहे. रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. ५)पर्यंत २ लाख २५ हजार १ हेक्टरवर (८३.०९ टक्के) पेरणी झाली आहे.

ई-पीक अॅपद्वारे जिल्ह्यातील ५९ हजार ९३३ शेतकऱ्यांनी रब्बीतील १ लाख ३० हजार २५२ हेक्टरवरील पीक पेऱ्याची नोंद केली आहे. रब्बीच्या पेरणी क्षेत्रास अनुसरून येणारी ई-पीकपाहणी क्षेत्राची टक्केवारी ४८.१० टक्के एवढी आहे. शेती खात्यांच्या क्षेत्रास अनुसरून येणारी ई-पीकपाहणीची टक्केवारी २१.४४ टक्के आहे.

शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या विविध पिकांची वस्तुनिष्ठ आकडेवारी उपलब्ध व्हावी. त्यानुसार धोरणे ठरविता यावीत. पीकविमा नुकसान भरपाई आदी बाबींसाठी ई-पीकपाहणी करणे आवश्यक आहे. परंतु अनेक भागांत इंटरनेट कनेक्टिव्हिटी अभावी ई-पीकपाहणी करणे संबंधित शेतकऱ्यांना अशक्य होत आहे.

ई-पीकपाहणीचे महत्त्व समजावून सांगण्यात कृषी, महसूल, ग्रामविकास विभागाकडून पुरेशा प्रमाणात जनजागृती केली जात नसल्यामुळे अनेक शेतकरी ई-पीकपाहणीच्या बाबतीत उदासीन आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र व ई-पीकपाहणी क्षेत्र यांच्या मोठी तफावत दिसून येते. संपूर्ण पेरणी क्षेत्राची ई-पीकपाहणी होण्यासाठी प्रभावीपणे जागृतीची गरज आहे.

ई-पीकपाहणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका शेती खाते संख्या एकूण क्षेत्र रब्बी सरासरी क्षेत्र ई-पीकपाहणी क्षेत्र ई-पीकपाहणी शेतकरी संख्या

परभणी ९९५५५ १०९८९९ ५७९०० ९१२६२ १९०५८

जिंतूर ९३०९१ ११९१६३ ५३७३० ११५४० ८६९५

सेलू ६१६४९ ६८६०२ ३३५६१ ७५७४ ५३३८

मानवत ४०५३४ ४८१३४ १६११९ ३८९५ ३६१७

पाथरी ४५७७१ ५२९३३ १७९७२ ३७५१ २८९०

सोनपेठ ३३३१२ ३६९५३ .१५६९८ २९८१ २७३२

गंगाखेड ७४०१३ ६३१४३ ३२०८६ ३६०६ १२६२२

पालम ४९०७१ ४७९६८ २०१३० २०६६ १७२१

पूर्णा ६३३३६ ६०७५९ २४४९५ ३५७३ ३२६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT