Paddy  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : परतीच्या पावसामुळे हळवी भातशेती धोक्यात

Paddy Farming : मागील आठवड्यात सक्रिय झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका हळवी भातशेतीला बसू लागला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

Team Agrowon

Roha News : मागील आठवड्यात सक्रिय झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका हळवी भातशेतीला बसू लागला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. दरवर्षी या हंगामात सायंकाळच्या सुमारास सक्रिय होणारा परतीचा पाऊस या वर्षी मात्र दिवसातून अनेकवेळा कोसळत असल्याने याचा सर्वात मोठा फटका मात्र भातशेतीला बसू लागला आहे. भाताची हळवी पिके ही ९० ते शंभर दिवसांत तयार होतात.

त्या अनुषंगाने जुलै महिन्यात लागवड करण्यात आलेली हळवी भातशेती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्‍यामुळे येत्या दहा ते पंधरा दिवसात भात कापणीचा हंगाम सुरू होईल, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. परंतु गेल्‍या काही दिवसापासून परतीचा पाऊस सक्रिय झाल्याने कापणीचा हंगाम लांबणार असल्याची भीती शेतकरीवर्गाला वाटू लागली आहे.

त्यामुळे तयार झालेली भाताची कणसे कापताना बहुतेक धान्य गळून जात असल्याने शेतकरी वर्गाचे खुप मोठे नुकसान होत आहे. वाढत्या महागाईमुळे शेती परवडत नसल्याने नाईलाजाने व वडिलोपार्जित व्यवसाय म्हणून तसेच रोजंदारीचे साधन म्हणून शेतकरी वर्गाने आपला व्यवसाय टिकून ठेवला आहे.

यावर्षी हळवी भातशेती कापणीलायक झाली असतानाच परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकरी वर्गावर फार मोठे संकट कोसळले आहे.तालुक्यातील कोलाड, खांब, सुतारवाडी परिसरात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातले आहे. वादळी वाऱ्यासहित कोसळणाऱ्या पावसात भातशेती पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे.

दिवसेंदिवस बी - बियाणे, रासायनिक खते, नांगरणी, मजुरीचे दर वाढत चालले आहेत. तरीही शेतकरी वर्ग मोठ्या कष्टाने भातशेती करीत आहे. यावेळी भातपीक चांगले येऊनही परतीच्या पावसाने मात्र भातशेती जमीनदोस्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडांशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.
- लिलाधर दहिंबेकर, प्रगत शेतकरी, गोवे (कोलाड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity: नाशिक जिल्ह्यात १०८४ गावांमध्ये संभाव्य टंचाई

Local Body Elections: रत्नागिरी,सिंधुदुर्गात उमेदवारांपेक्षा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Leopard Sightings: बिबट्याच्या त्रासाने शेतकरी हैराण

Local Body Elections: कोल्हापुरात वैयक्तिक गाठीभेटींना प्राधान्य

Agriculture Festival: ‘कृषिपर्व’ महोत्सवात एआय वर विशेष मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT