Paddy Crop Management : भातावरील कडाकरपा रोगाचे व्यवस्थापन

Paddy Disease Management : भातामध्ये सद्यःस्थितीत करपा, कडाकरपा, खोड कुजव्या, पर्णकोष करपा या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. या रोगांच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी सर्व्हेक्षण करून पूर्वनियंत्रणाचे उपाययोजना करण्याची गरज आहे.
Paddy Crop
Paddy Crop AgrowoAg
Published on
Updated on

डॉ. श्रीकांत ब्राह्मणकर, डॉ. अनिल कोल्हे

Paddy Farming Management : कडाकरपा या जिवाणूजन्य रोगामुळे रोपे व पाने पिवळी पडून वाळतात. पाने टोकाकडून व कडेने करपत असल्यामुळे याला कडाकरपा असे म्हणतात. तापमान २५ ते ३५ अंश सेल्सिअस व आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा जास्त या पोषक स्थितीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. या रोगाचा प्रसार बियाणे, रोगग्रस्त पेंढा, रोगग्रस्त पिकाच्या खाचरातून वाहणारे पाणी यांपासून होतो. रोगग्रस्त शेतातील धसकटे, रानटी भात, गवत, नागरमोथा इ. तणांमुळेही रोगाचा प्रसार होतो. जोराचा वारा व सततच्या भारी पावसामुळे रोगग्रस्त झाडांपासून संपूर्णपणे पिकामध्ये पसरतो. संवेदनशील वाणामध्ये नत्र खताचा अवास्तव वापर केल्यास हा रोग गंभीर स्वरूप धारण करतो.

सर्वसाधारणपणे या रोगामुळे ८ ते १० टक्क्यांपर्यंत पिकांचे नुकसान होते. परंतु रोगासाठी संवेदनशील वाणांमध्ये पोषक वातावरणात उत्पादनात ७० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. लोंब्या बाहेर पडण्यापूर्वी प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनामध्ये फारशी घट होत नसली तरी दाण्याची प्रत खालावते, तांदळाचे दाणे तुटतात व अपेक्षित दर मिळत नाही.

Paddy Crop
Paddy Pest Management : भातावरील खोडकिडीचे व्यवस्थापन

लक्षणे

जुन्या पानावर किंवा पानाच्या शेंड्यावर पिवळ्या केसरी रंगाचे नागमोडी किनार असलेले पानेरी चट्टे, रेषा आढळून येतात. पानाच्या खालच्या बाजूने वाढणारी ही लक्षणे कालांतराने पर्णकोषावर सुद्धा पसरतात. रोगाचे प्रमाण वाढल्यास या रेषा एकमेकांमध्ये मिसळून पांढऱ्या पट्ट्या देठापर्यंत वाढत जाऊन पूर्ण फुटवे कुजून जातात.

सकाळच्या वेळी पानाच्या खालच्या बाजूने नवीन चट्ट्यामधील स्राव दुधी दवबिंदूसारखा दिसतो. नंतर तो वाढून लहान पिवळसर काचेच्या तुकड्यासारखा दिसतो.

Paddy Crop
Paddy Crop Management : भातावरील गादमाशीचे नियंत्रण

रोगाचे निदान

नवीन लक्षणे असलेले पान चट्ट्यापासून कापून काचेच्या ग्लासात घेतलेल्या स्वच्छ पाण्यात टाकावे. काही मिनिटांनंतर ग्लास प्रकाशात धरून पाहिल्यास कापलेल्या चट्ट्यातून जाडसर किंवा गढूळ स्राव बाहेर येत असल्याचे दिसेल.

व्यवस्थापन

नत्र खताचा वापर शिफारशीनुसार करावा. पिकावर रोग असताना नत्र खताचा वापर करू नये.

शेताचे बांध व धुरे तणमुक्त ठेवावेत.

रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, फवारणी प्रति १० लिटर पाणी.

कॉपर हायड्राक्साइड (५३.८ टक्के डी.एफ.) ३० ग्रॅम किंवा स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट (९० टक्के) अधिक टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराइड (१० टक्के एस.पी.) (संयुक्त जिवाणूनाशक) १.५ ग्रॅम

आवश्यकता भासल्यास ८ ते १० दिवसांच्या अंतराने दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

डॉ. श्रीकांत ब्राह्मणकर, ९५५२१७९२३९

(सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

डॉ. अनिल कोल्हे, ९९२२९२२२९४(सहयोगी संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com