Water Storage in Dams Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : मंगरूळ, सुकी, अभोडा धरणांमुळे केळी पट्ट्याला यंदाही दिलासा

Banana Crop : सातपुड्याच्या कुशीमध्ये यावल व रावेरातील मंगरूळ मध्यम प्रकल्पामुळे अनेक केळी उत्पादक गावांना दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : सातपुड्याच्या कुशीमध्ये यावल व रावेरातील मंगरूळ मध्यम प्रकल्पामुळे अनेक केळी उत्पादक गावांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागातही प्रकल्प बऱ्यापैकी भरले आहेत. परंतु सातपुड्यातील सर्वच प्रकल्प मागील चार - पाच वर्षे भरले आहेत.

यंदाही रावेरातील मंगरूळ, अभोडा, यावलमधील गारबर्डी, मोर या प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे. सुकी, मंगरूळ, अभोडा हे प्रकल्प मागील महिन्यातच १०० टक्के भरले आहेत. यामुळे केळी व अन्य पिकांच्या सिंचनासाठी स्रोत उपलब्ध होणार आहेत.

भोकरी नदीवरील मंगरूळ हा लघुसिंचन प्रकल्प यंदाही चांगल्या पावसाने भरून वाहू लागला आहे. या प्रकल्पातील पाणी सांडव्यावरून नदीपात्रात आले. नदीही अनेक दिवस प्रवाही आहे. या नदीच्या किनाऱ्यावर आणि परिसरात असलेल्या तालुक्‍यातील सुमारे बारा-तेरा गावांच्या भूगर्भातील पाणीपातळी उंचावण्यास मदत झाली आहे.

हा प्रकल्प मागील वेळेसही १०० टक्के भरला होता. मागील चार वर्षे हा प्रकल्प १०० टक्के भरत आहे. सातपुड्याच्या पट्ट्यात आणि मध्य प्रदेशातील या नदीच्या उगमस्थळी पाऊस झाल्यास हा प्रकल्प भरतो. यंदाही जुलैतच हा प्रकल्प १०० टक्के भरून ओसंडून वाहू लागला होता. एकूण ६.४१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा क्षमता असलेला हा प्रकल्प केळी पट्ट्यासाठी महत्त्वाचा आहे.

प्रकल्प भरून वाहिल्याने त्याचे पाणी मुखापर्यंत पोचते. रावेरातील मंगरूळ, पिंप्री, केऱ्हाळा बुद्रूक, केऱ्हाळा खुर्द, भोकरी, अहिरवाडी, कर्जोद, तामसवाडी, वाघोड, पुनखेडा, बोरखेडा, पातोंडी आदी गावांना त्याचा फायदा होतो. या गावांतील भूगर्भातील पातळी वाढून विहिरी-कूपनलिकांची पाणी पातळी वाढते. सेच यावलमधील गारबर्डी लघु प्रकल्प, मोर मध्यम प्रकल्पदेखील भरले आहेत. या प्रकल्पांमुळे यावल, रावेरातील सातपुड्यालगच्या भागात दिलासा मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT