Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Shortage : खानदेशात खतांचा कमी पुरवठा, पुढे टंचाई शक्य

Fertilizer Supply : खानदेशात डीएपी व सुपर फॉस्फेट वगळता अन्य खतांचा पुरवठा कमी आहे. त्यात संयुक्त खतांची मागणी केळी व भाजीपाला पट्ट्यात अधिक आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात डीएपी व सुपर फॉस्फेट वगळता अन्य खतांचा पुरवठा कमी आहे. त्यात संयुक्त खतांची मागणी केळी व भाजीपाला पट्ट्यात अधिक आहे. यामुळे खतपुरवठा संथ गतीने या हंगामात सुरू राहिल्यास पावसात टंचाई तयार होईल, अशी स्थिती आहे.

१०.२६.२६ या खताचा पुरवठा मागील दोन-तीन वर्षे कमी आहे. मागणी या खताची सर्वाधिक असते. परंतु पुरवठा कमी असते. या खताची जळगाव जिल्ह्यात खरिपात २२ ते २६ हजार टन मागणी असते. परंतु पुरवठा १८ हजार टनदेखील होत नाही. सर्वच शेतकरी १०.२६.२६ ची मागणी करतात.

केळी, भाजीपाला पट्ट्यात या खताचा उठाव अधिक आहे. याच भागात टंचाई असते. या खताचा खरिपातील पुरवठा या महिन्यात सुरू होईल. या महिन्यात किमान तीन ते चार हजार टन १०.२६.२६ या खताचा पुरवठा अपेक्षित आहे. परंतु अद्याप या खताचा हवा तेवढा पुरवठा झालेला नाही.

युरियाची मागणीदेखील १०.२६.२६ सारखीच आहे. अनेक शेतकरी एकाच वेळी युरियाची खरेदी करतात. अन्य भागात यामुळे तुटवडा तयार होतो. यामुळे प्रत्येक भागात समान वितरण व एकाच शेतकऱ्यास अधिकचे खत देणे टाळले पाहिजे, असाही मुद्दा उपस्थित होत आहे. युरियाचा या हंगामात सुमारे ७६ हजार टन पुरवठा होईल. एकूण तीन लाख टन विविध खते जिल्ह्यात खरिपात येतील.

त्याचा पुरवठा लक्ष्यांक वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केला आहे. परंतु या लक्ष्यांकानुसार पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे कृषी विभागासमोर हा पुरवठा करून घेण्याचे आव्हान आहे. कारण खत पुरवठा विविध खत कंपन्या करतात. त्यात कमाल कंपन्या शासनाच्या किंवा केंद्र सरकार पुरस्कृत आहेत. या कंपन्यांकडून सुरळीत खतपुरवठा होत नाही. जळगाव जिल्हा खतवापरात सर्वांत पुढे आहे.

पाऊस आल्यानंतर कडधान्ये, तृणधान्य, तेलबिया व अन्य कोरडवाहू पिकांची पेरणी सुरू होईल. अनेक शेतकरी पेरणी करतानाच खतेही देतात. या काळात खतांची मागणी असते. अद्याप खानदेशात पाऊस दाखल झालेला नाही. परंतु या महिन्यात सर्वसाधारण पाऊस येईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामुळे या महिन्यात पुरेशी खते हवी आहेत. पुढे ऑगस्टमध्येही खतांची मागणी असते. या काळातही खतपुरवठा सुरळीत असावा, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT