Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Level : पावसाअभावी धरणांत पाण्याची आवक घटली

Dam water level : पुणे जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने धरणातील पाणी पातळी देखील कमी झाली आहे. जुलै महिन्यात झालेला पाऊस (Rain) पिकांसाठी समाधानकारक ठरलाय. मात्र या पावसाचा धरण साठ्यांना (pune) फारसा लाभ झालेला नाही.

Team Agrowon

Water level drops : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण नाही. धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. घाटमाथ्यावर पावसाच्या अधूनमधून तुरळक सरी बरसत असल्या तरी पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याची आवक घटली आहे. बुधवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंत ०.७६ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली असून, जिल्ह्यातील २६ धरणांत १५९.९२ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. अनेक धरणे अजूनही पूर्णपणे भरली नसल्याने येत्या काळात पाऊस न झाल्यास पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे.

पावसाचे जवळपास अडीच महिने लोटले आहेत. या काळात फारसा पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. जूनच्या अखेरीस पावसाने हजेरी लावली असली, तरी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. १८ जुलैनंतर पावसाने काही प्रमाणात सुरुवात केली होती. ३१ जुलैपर्यंत पावसाने जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात आणि धरण क्षेत्रात जोरदार सरी पडल्या. तर मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, कुंडली या घाटमाथ्यावर पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावली. त्यामुळे मुळशी, वरसगाव, पवना, कासारसाई, भामा आसखेड, आंध्रा, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर, डिंभे या धरणांत ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला. पानशेत, कळमोडी, चासकमान, वडीवळे ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. खडकवासला धरणही एक वेळा शंभर टक्के भरून वाहिले होते.

सध्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर नसला तरी अधूनमधून तुरळक सरी बरसत आहेत. त्यामुळे ओढे, नाल्यांतील पाण्याचा प्रवाह काही प्रमाणात कमी झाला असल्याने धरणांतील पाण्याच्या आवकेत घट झाली आहे. जुलैच्या अखेरीस धरणांत साडेनऊ टीएमसीपर्यंत आवक झाल्याने धरणांतील पाणीपातळीत वाढ झाली होती. परंतु काही धरणक्षेत्रांत अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे टेमघर, शेटफळ, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, घोड, विसापूर या धरणांतील पाणीसाठा हा ८० टक्क्यांहून कमी आहे. काही धरणांत ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा असून, नाझरे धरण ऐन पावसाळ्यात कोरडे पडल्याचे चित्र आहे. उजनी धरणात अवघा १३ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यातच आता पाऊस नसल्याने धरणांतील पाणीपातळी वाढण्याची शक्यता कमी झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी

गेल्या वर्षी याच काळात दहा धरणे शंभर टक्के भरली होती. उर्वरित धरणांतही ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने तब्बल १९१.६६ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी कमी पाणीसाठा झाल्याने पाण्याची टंचाई उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Shortage : युरियाचा कमी वापर करा, ८०० रुपये मिळवा, आंध्र प्रदेशला असा निर्णय का घ्यावा लागला?

Village Rehabilitation: मसाळा गावातील केवळ २८८ घरांचेच पुनर्वसन शक्य 

AI in Agriculture: कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे माती, पिकांची आरोग्य तपासणी

Panand Road: परभणी जिल्ह्यात आजपासून शेत रस्ते विषयक मोहीम

Interview with Pasha Patel: पृथ्वी व मानवजातीच्या शाश्वत विकासाचा मार्ग

SCROLL FOR NEXT