Kharif Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop : पावसाअभावी पिके टाकू लागल्या माना

Kharif Season : पुणे जिल्ह्यातील अनेक भागात पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे खऱीप पिकांच्या वाढीला ओल नसल्याने ८५ ते ९० टक्के पिकांनी माना टाकल्या आहेत

Team Agrowon

Pune News : पुरंदर तालुक्यात पावसाने दीर्घकाल दडी मारल्याने कशीबशी ७१.३८ टक्केच पेरणी झाली. उगवलेली पिकेही कोमेजून गेल्याने दुबार पेरणी काही शेतकऱ्यांनी केली, मात्र आता तीही संकटात आहे.

तालुक्यातील तब्बल ५,५००.१ हेक्टर क्षेत्र पेरणीशिवाय रिकामे राहिले आहे. दुसरीकडे ज्या पेरण्या झाल्या आहेत, त्या पिकांच्या वाढीला ओल नसल्याने ८५ ते ९० टक्के पिकांनी माना टाकल्या आहेत, असे चिंताजनक चित्र तालुक्यातील बहुतेक शिवारात आहे.

तालुक्यात एकूण खरीप सरासरी क्षेत्र १९,२१९.३५ हेक्टर आहे. तुलनेने तालुक्यात पेरणी झालेले क्षेत्र १३,७१९.२५ हेक्टर आहे. म्हणजेच ७१.३८ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. म्हणजेच एकूण खरीप क्षेत्रातील २८.६२ टक्के क्षेत्र म्हणजेच ५,५००.१ हेक्टर क्षेत्र पेरणीअभावी रिकामे राहिले आहे.

सासवड (ता. पुरंदर) येथील शासकीय, निमशासकीय, खासगी बियाणे, खते, निविष्ठा विक्रेत्यांकडून नेलेला महागाचा माल कित्येकांचा लहरी पावसाने वाया जातो की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

विहिरी, बोअर यांची पाणीपातळी वाढण्यासाठी जोराचा पाऊस झाला नसल्याने शेतशिवारात दुष्काळाची चाहूल घोंघावत आहे, असे नंदकुमार जगताप, ज्ञानेश्‍वर मेमाणे, रामचंद्र खेडेकर, देवानंद जगताप, हनुमंत सोळसकर, तुषार इटकर, कुंडलीक मेमाणे, रामचंद्र खेडेकर, दीपक टकले, रोहिदास गिरमे, म्हस्कू खेडेकर, मुरलीधर झेंडे या शेतकऱ्यांनी सांगितले.

तालुक्यात ऊसक्षेत्र सरासरी २,६२२.६० हेक्टरवर पोहोचले आहे. मात्र पावसाअभावी सध्या १,८१२.९० हेक्टर क्षेत्रातच म्हणजे ६९.१३ टक्के क्षेत्रावरच ऊस आहे. म्हणजेच उसातही ३०.८७ टक्के पिकाची घट दाखवीत आहे.

तालुक्यातील सासवड मंडल वगळता बाकी सहाही कृषी मंडलांत अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे भिवडी, सासवड मंडलांतील काही गावांचा अपवाद वगळता बाकी ठिकाणी दुष्काळाचे सावट दिसून येत आहे.

पीक.... सरासरी क्षेत्र...पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये) कंसात पेरणीची टक्केवारी

भात...१,०१२.६०...१,१०२.९०...(९१.२९ टक्के)

भात रोपवाटिका...१२१... १३६.९०.... (११३.१४)

धान्याची मका...४६५.१६...०० (०० टक्का)

बाजरी...१२,३२७.३०...५,६०१.६० (४५.४४ टक्के)

एकूण तृणधान्य सरासरी क्षेत्र...१४,०००.५१...६,७०४.५० (४७.८९ टक्के)

पुरंदरला सध्या शेतशिवारात चिंताग्रस्त स्थिती आहे, हे खरे आहे. अजूनही चांगला पाऊस झाला, तर संकरित बाजरी, सूर्यफूल, तीळ, तूर, धने आदी पिकांची पेरणी उर्वरित शेतकरी करू शकतात. मात्र भुईमूग, संकरित ज्वारी, सोयाबीन, तीळ, रागी आदी पेरण्या करू नयेत. २० सप्टेंबरनंतर मात्र रब्बी ज्वारी, करडई, सूर्यफूल घेऊ शकतात. तशी कृषी विभागाची शिफारस आहे. पुढे पाऊस झाला तर ऑक्टोबरमध्ये इतर रब्बी पिकांसह हरभरा, करडई, गहू, जवस घ्यावे लागेल.
- सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी, ता. पुरंदर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सिताफळाची आवक वाढली; आवळ्याला कमी उठाव, हिरवी मिरची नरमली, लिंबुचे दर टिकून, लसणाचे दर स्थिर

Leopard Attack : निमगावात बिबट्याचा घोड्याच्या शिंगरूवर हल्ला

Dam Water Discharge : वाघूर, गिरणातून विसर्ग

Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात १.३३ लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा

Rain Damage Jalgaon : पावसाने जळगाव जिल्ह्यात हानी

SCROLL FOR NEXT