Kharif Season : दहा लाख हेक्टरवरील पिके संकटात

Kharif Crop : पावसाअभावी पुणे विभागातील जवळपास दहा लाख हेक्टर क्षेत्र संकटात सापडले आहे.
Kharif season
Kharif seasonAgrowon

Pune News : पावसाचे अडीच महिने उलटले तरी पुरेसा पाऊस न पडलेला नाही. त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. पावसाअभावी पुणे विभागातील जवळपास दहा लाख हेक्टर क्षेत्र संकटात सापडले आहे. सध्या अनेक ठिकाणी पिके आता सुकत असून अखेरची घटका मोजत आहेत. तर काही ठिकाणी खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे.

Kharif season
Kharif Crops : पुणे विभागात ९९ टक्के पेरण्या; १० लाख ५९ हजार हेक्टरवर पेरा

जुलैच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे पेरणीचा टक्का वाढला आहे. पुणे विभागात खरिपाचे सरासरी दहा लाख ६५ हजार ४८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी अकरा लाख ४९ हजार १३५ हेक्टर म्हणजेच १०८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात पेरणी कमी असली तरी सोलापूर, नगर जिल्ह्यांत पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु एकंदरीत पावसाचे प्रमाण हे पुणे आणि नगर जिल्ह्याचा अकोले तालुका वगळता उर्वरित भागात पावसाचे कमी राहिले आहे. त्यामुळे जवळपास दहा लाख हेक्टरवरील पिकांची वाढ खुंटली आहे.

माझ्याकडे एकूण ५० एकर शेती आहे. त्यामध्ये चालू वर्षी २० ते २५ एकरांवर ऊस लागवडीचे नियोजन केले होते. परंतु पाऊस पडलेला नाही. त्यामुळे फक्त आठ ते दहा एकर उसाची लागवड केली आहे. याशिवाय खरिपात सोयाबीन, हळद, कांदा ही पिके घेण्याचे ठरवले होते. परंतु पावसाअभावी ही पिकेही घेतलेली नाही. विहिरींनी तळ गाठला आहे.
- धनंजय आटोळे, प्रगतशील शेतकरी, राजेगाव, दौंड
पुणे जिल्ह्यातील भात पट्यात पाऊस असल्याने पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. परंतु पूर्व भागात अजूनही पाऊस पडलेला नाही. जो काही पाऊस पडलेला आहे, तोही अत्यंत कमी आहे. त्यातच पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद या पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

जुलैमध्ये पावसाने काही ठिकाणी दमदार हजेरी लावली. त्यामुळे भाताच्या जवळपास ७४ हजार ७८० हेक्टरवर लागवडी झाल्या असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. ऑगस्टमध्ये पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, नगर, सोलापूर जिल्ह्यांत पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने पावसाची फारशी नोंद झालेली नसून आता महिना संपत आला आहे. आता पाऊस नसल्याने पिके सुकत असल्याचे चित्र आहे.सध्या पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात अनेक ठिकाणी तुरळक सरी बरसत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com