Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Crisis : करप्यामुळे सिंधुदुर्गातील भातपीक संकटात

Paddy Disease Issue : सिंधुर्दुग जिल्ह्यात करप्याच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत असून अनेक शेतकऱ्यांचे भातपीक हातातून निसटत असल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुर्दुग जिल्ह्यात करप्याच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत असून अनेक शेतकऱ्यांचे भातपीक हातातून निसटत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.तर रत्नागिरीत निळे भुंगेऱ्यासह अन्य कीडींच्या प्रादुर्भावामुळे फुलोऱ्यात आलेली हिरवी भातशेती अडचणीत आली आहे. कीड प्रादुर्भावावर नियंत्रण न आल्यास यावर्षी भातशेतीचे उत्पादन घटण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सिंधुर्दुग जिल्ह्यात यावर्षी ६२ हजार हेक्टरवर भातपीक लागवड आहे. जुलै अखेरीपर्यंत यावर्षी भातरोप पुनर्लागवड सुरू होती. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली. काही भागांत हलक्या सरी तर काही भागांत कडक ऊन यामुळे जिल्ह्यात करपा रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला. शेकडो एकर भातपिकावर करप्याचा प्रादुर्भाव झाला. काही शेतकऱ्यांची पिके पुर्णतः हातातून गेली.

भातपिकाची पात पूर्णतः जळल्यासारखी दिसत आहे. याशिवाय भातपिकावर निळे भुंगेऱ्याचादेखील प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाणथळ जमिनीत लागवड केलेल्या पिकांमध्ये हे प्रमाण कमी असून पाणी नसलेल्या जमिनीत अधिक आहे. जिल्ह्यात काही दिवस ऊन-पाऊस असल्यामुळे भातपिकावर खोडकीड, निळे भुंगेरे, करपासह विविध कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. कीड-रोग नियत्रंणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांची, बुरशीनाशकांची फवारणी कृषी विभागाच्या सल्ल्याने करावी, असे आवाहन मुळदे संशोधन केंद्रांकडून करण्यात आले आहे.

रत्नागिरीत आठ हेक्टर भातशेती धोक्यात

रत्नागिरीत निळे भुंगेऱ्यासह अन्य कीडींच्या प्रादुभार्वामुळे राजापूर तालुक्यातील नदी काठावरील शीळ, गोठणेदोनिवडे, पन्हेळ आदी गावांसह ओणी परिसरातील सुमारे सात-आठ हेक्टरवरील भातशेती बाधित झाली आहे. भातशेतीवरील किडींचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाकडून ‘अ‍ॅक्शन मोड’वर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल गावित यांनी दिली.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या लांजा येथील केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. सुदेश चव्हाण यांच्यासमवेत भेट देऊन शीळ, ओणी कोंडवाडीसह तालुक्यातील अन्य बाधित गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शीळ येथील भेटीवेळी सरपंच अशोक पेडणेकर, ग्रामसेवक श्री. डिगुळे, कृषी सहायक श्री. म्हस्के, तर ओणीच्या सरपंच श्रीमती भाबळे, पोलिस पाटील नडे, माजी सरपंच वसंत जड्यार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT