Dry Land Update Agrowon
ॲग्रो विशेष

Maharudra Manganale: कोरडवाहू शेती म्हणजे पालथा धंदा पण तरी आमची शेती आनंददायी...

Dry Land Update : गेल्या महिन्यात सहा हजार रूपये खाल्लेल्या बोअरवेलमधील केसिंग जेसीबीने काढण्याचा प्रयत्न केला. पंधरा फुटांपैकी जेमतेम तीन फुटांची केसिंग मोडून निघाली. तेवढ्यावर समाधान मानून तो बोअरवेल बंद करून टाकला.

Maharudr Mangnale

Dryland farming : गेल्या दहा वर्षांच्या काळात असं एकही वर्ष गेलं नाही की, ज्यावर्षी जेसीबी मशीन बोलावली नाही. ती मशीन पण ठरलेली आहे. तुकाराम बुरसपट्टे यांची. परवाला असाच पिच्छा करून मशीन बोलावली.

मळ्यात जादा पाऊस झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी फुटून माती वाहून जायची, अशा ठिकाणी मुरूम टाकला. एका वावरातील बांध पाण्यानं मोडला होता. तिथंही मुरूम टाकला.

विहिरीशेजारच्या छोट्या आंब्याजवळ सहा ट्रॅक्टर मुरूम टाकून त्याला छान ओटा केला. गेटबाहेर लक्ष्मीबागेला बाहेरून केलेलं ग्रीनशेडचं कुंपण वाऱ्याने सतत मोडून पडत होतं. तिथं चारही बाजूंनी मुरूमाचं कमरेएवढं कुंपण केलं.

गेल्या महिन्यात सहा हजार रूपये खाल्लेल्या बोअरवेलमधील केसिंग जेसीबीने काढण्याचा प्रयत्न केला. पंधरा फुटांपैकी जेमतेम तीन फुटांची केसिंग मोडून निघाली. तेवढ्यावर समाधान मानून तो बोअरवेल बंद करून टाकला.

खरं तर त्याच्या जन्माच्यावेळीच त्याचा मृत्यू झाला होता; पण त्याचा अंत्यविधी चार वर्षांनी झाला. कमीत कमी तीन लाख रूपये या बोअरवेलने खाल्ले. त्याचं खऱ्या अर्थाने अस्तित्व संपल्याने त्या आठवणीही विस्मृतीत जातील.

जेसीबी मशीन, भाड्याचे दोन ट्रॅक्टर आणि आमचं छोटं ट्रॅक्टर. सगळा १३ हजार ५०० रूपयांचा हिशोब लगेच पूर्ण केला. सायंकाळी पत्नी बोलली की, दरवर्षी तुम्ही जेसीबी मशीन बोलवताच... तुम्ही शेतीत आल्यापासून या मशीनवर किती पैसे खर्च झाले असतील?

मी म्हटलं, ``तुला माहित आहे. मी कुठलाच हिशोब लिहित नाही.त्यामुळं नेमका खर्च नाही सांगता येणार पण तीन लाखांच्या पुढचा तो आहे....`` मी म्हटलं की, आज जेसीबी मशीनने जी कामं केली ती गरजेची होती की नाही? अर्थात नाही असं उत्तर येणं शक्यच नव्हतं. काही आवश्यकच होती. काही भावनिक गरजेची!

खरं तर सोयाबीनची रास झाल्यानंतर शेतीत एक पैशाचंही उत्पन्न झालेलं नाही. तेव्हापासून आजपर्यंत फक्त आणि फक्त पैसे खर्च करणं सुरू आहे.गड्यांच्या पगारीशिवाय तो खर्च लाखाच्या वर गेलाय. कामांची यादी केली तर ती पानभर होईल. पण याबद्दल माझी तक्रार नाही. शेतीत राहात असल्याने हा खर्च अटळ आहे. हा शेतीवरचा नाही तर आमच्या जगण्यावरचा खर्च आहे.

परवा सकाळी मला लवकर बसस्थानकावर पोचायचं होतं. नरेश गावात गेला होता. मी आमचा शेतातील नवा सहकारी गजानन याला घेऊन ॲक्टिव्हावर निघालो. गजानन बोलला, ``सर, मी आल्यापासून बघतोय. मी जी कामं करतोय ते एकसुध्दा पैशाचं काम नाही.

आल्यापासून बागेतल्या झाडांची कटींग, बंधाऱ्याची कामं, हे जेसीबीचं काम यात पैशाचं काम काहीच नाही. मलाच कधी कधी असं वाटतयं की, माझं इथं काहीच काम नाही. उगीच मला पगार देताय..एकटा नरेशभाऊ हे सगळं करू शकला असता...``

मी हसून म्हटलं की, तुझी गरज आहे म्हणून तर तुला ठेवलयं. तुला तसं वाटणं साहजिक आहे. कोरडवाहू शेतीत खरिपाचं एक पीक निघालं की, पुढे काय असतं? आपल्याकडं बाग तरी आहे.तू नफ्या-तोट्याचा विचार करू नकोस.आम्ही तो कधीच करत नाही.आमचं आनंददायी जगणं म्हणजे हेच आहे. अशा हिरवाईत राहायला मिळणं ही मोठी गोष्ट आहे.

मी म्हणालो, तुला सुध्दा हैद्राबादला कोंबड्यांच्या शेडवर इथल्यापेक्षा नक्कीच जास्त पैसे मिळत होतेच की ! पण ते जगणं आणि रुद्रा हटवरचं जगणं याची तुलना करून बघ. कितीही पैसे मोजले तरी, हे जगणं मिळत नाही. पैशात याची किंमत करता येत नाही.....

गजाननला हे मनापासून पटलं असावं. तो मस्त हसत बोलला, हे एकदम खरं हाय बघा सर !

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT