Dryland Farming : कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी ३५ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी ३५ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आला आहे.
Dryland Area Development Fund
Dryland Area Development Fund Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत (National Mission for Sustainable Agriculture) कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी (Dryland Area Development Fund) ३५ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आला आहे.

हे अनुदान बारामती कृषी उपविभागात (Baramati Agriculture Department) दौंड आणि इंदापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत शाश्वत वाढ करून नवीन उपजीविकेच्या साधनांची उपलब्धता करून त्याआधारे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येतो.

निरनिराळ्या एकात्मिक शेती पद्धतींचा अवलंब करून दुष्काळ, पूर व हवामानातील अनपेक्षित बदलामुळे होणारे नुकसान टाळणे, अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादन वाढविणे व शाश्वत रोजगार उपलब्ध करणे, कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनातील जोखीम कमी करून शेतकऱ्यांचा कोरडवाहू शेतीबाबत आत्मविश्वास वाढविणे हे योजनेचे प्रमुख उद्देश आहेत.

Dryland Area Development Fund
शिल्लक उसाला ७५ हजार रुपयांचे अनुदान द्या

या योजनेअंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या निधी वितरणाचे प्रमाण ६०:४० असे आहे. फळपीक आधारित शेती पद्धतीस २५ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान असणार आहे.

दुग्धोत्पादक पशुधन आधारित शेती पद्धतीस प्रति हेक्टर ४० हजार रुपये, इतर पशुधन आधारित शेती पद्धतीस प्रति हेक्टर २५ हजार रुपये, ग्रीन हाउस ट्यू ब्यूलर टाइप नैसर्गिक वायूवीजनास प्रति चौ.मी. ला ४६८ रुपये, शेडनेट हाउससाठी प्रति चौ.मी. ला ३५५ रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येते.

Dryland Area Development Fund
Tribal Area : आदिवासी भागात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करा

मूरघास युनिटसाठी १ लाख २५ हजार रुपये प्रति युनिट, मधुमक्षिका पालनासाठी प्रति कॉलनीस २ हजार रुपये, काढणीपश्चात तंत्रज्ञानास प्रति चौ.मी. साठी ४ हजार रुपये, गांडूळ खत युनिट (कायमस्वरूपी) ५० हजार रुपये प्रति युनिट आणि हिरवळीचे खत प्रति हेक्टर २ हजार रुपये अनुदान असणार आहे.

कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी दौंड तालुक्यातील पिंपळाचीवाडी-खोर येथे पशुपालनाच्या १३ घटकांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये २ लाख ६० हजार, सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ५० घटकांसाठी १० लाख, गांडूळखताच्या १ युनिटसाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये ५० हजार, मुरघासच्या ४ युनिटसाठी सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ५ लाख रुपयांचे असे सर्व मिळून १८ लाख १० हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

इंदापूर तालुक्यातील वायसेवाडी - कळस येथे पशुपालनाच्या २० घटकांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये ४ लाख, सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ३२ घटकांसाठी ६ लाख ४० हजार, गांडूळखत युनिटच्या २ घटकांसाठी सर्वसाधारण प्रवर्गामध्ये १ लाख रुपये, मुरघास युनिटच्या २ घटकांसाठी २ लाख ५० हजार, सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ३ घटकांसाठी ३ लाख ७५ हजार रुपयांचे असे एकूण १७ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.


योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा आणि कोरडवाहू क्षेत्रातील इच्छुक घटकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com