Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Crop In Crisis : नांदेडला पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

Kharif Season : यंदा मान्सूनपूर्व तसेच मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर पावसाचे दमदार आगमन झाले नाही.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात जुलै महिना अर्धा संपूनही पावसाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी, खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग, ज्वारी या पिकांची वाढ खुंटली आहे. जिल्ह्यात १७ जुलैपर्यंत २८९.४० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना आजपर्यंत १२४.४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे तब्बल ७५.२० मिलिमीटर पावसाची तूट निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पावसाळ्याच्या पाच महिन्यात सरासरी ८९१.० मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मान्सूनपूर्व तसेच मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर पावसाचे दमदार आगमन झाले नाही. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी २१४.२० मिलिमीटरानुसार वार्षिक सरासरीच्या केवळ २४.०३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊसही ठराविक भागातच झाला आहे.

दरम्यान शेतकऱ्यांनी जूनमध्ये झालेल्या पावसानंतर पेरण्याची कामे आटोपून घेतली. यंदाही सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. यासोबतच कपाशी व हळदीचा पेरही यंदा वाढला आहे. या पिकांना पेरणी करून सध्या एक ते दीड महिन्याचा कालावधी होत आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात मागील दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.

परिणामी खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग, ज्वारी या पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक भागात सोयाबीन पिकांवर किडींचा प्रादुर्भावही झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे सोयाबीनला मर लागली आहे. जिल्ह्यात जून ते आक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीत सरासरी ८९१.३० मिलिमीटर पाऊस पडतो.

तर ता. १७ जुलैपर्यंत २८९.४० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षीत होते. असे असताना आजपर्यंत १२४.४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात तब्बल ७५.२० मिलिमीटर पावसाची तूट निर्माण झाली आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे कमी कालावधीची मूग, उडीद यांसारख्या पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात ता. १७, १८ व १९ जुलै या कालावधीत यलो अलर्ट जारी केला आहे. परंतु जिल्ह्यात मात्र ढगाळ वातावरण असलेतरी पावसाने मात्र अद्याप सुरुवात केली नाही. यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला ४ हजार ५०० रुपयांचा दर, धानाला ३ हजार ५०० हमीभाव, महिलांना दरमहा २ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन; अभिनेते विजय यांच्या पक्षाचा जाहीरनामा

Orchard Farmers Support: फळबाग उत्पादकांना आर्थिक आधार

Krishi Seva Kendra: सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Onion Storage Tips: कांदा साठवताना होणाऱ्या चुका टाळा, नुकसान वाचवा

Rural Roads Survey: ग्रामपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यांच्या सर्वेक्षणाचा निर्णय

SCROLL FOR NEXT