Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop In Crisis : निलंग्यात ८० हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

Monsoon Delay : पाऊस नसल्यामुळे तालुक्यातील ८० हजार हेक्टरवरील खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे.

Team Agrowon

Dharashiv News : तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, उडीद, मुग, तूर पिकावर परिणाम झाला असून, कोमेजू लागली आहेत. हलक्या प्रतीच्या जमिनीवरती पिके दुपारच्या वेळी माना टाकत आहेत.

सध्या पिकाला पावसाची गरज असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस नसल्यामुळे तालुक्यातील ८० हजार हेक्टरवरील खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे. जून महिन्यातील मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर आद्रा नक्षत्राने पेरणीसाठी हात दिला.

मात्र त्यानंतर पावसाने जवळपास एक महिन्यापासून दडी मारल्याने सोयाबीन फुलधारणेच्या अगोदरच कोमेजून जात आहे. तर मुग, उडिदाचा पेरा चक्क वाया गेल्याचे चित्र पाहायला मिळत असून, आता येत्या दोन-चार दिवसात वरुणराजा प्रसन्न झाला नाही तर निलंगा तालुक्यातील ८० हजार हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात येऊन शेतकरी मोठ्या अडचणीत सापडणार आहे.

निलंगा तालुक्यात खरिपाचे एकुण क्षेत्र ९५ हजार हेक्टर असुन, मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्याने खरिपाच्या १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. त्यात ७४ हजार हेक्टरवर सोयाबीन, ३ हजार हेक्टरवर मुग, २ हजार ८०० हेक्टरवर उडीद, ५ हजार हेक्टरवर खरीप ज्वारी, १५ हजार हेक्टर तूर असा पेरा आहे.

एकूण क्षेत्राच्या ८० ते ८५ टक्के सोयाबीन या नगदी पिकाची पेरणी करण्यात आली आहे. त्यातच निलंगा तालुक्यात यंदा बोगस बियाणांच्या सुळसुळाटामुळे जवळपास २ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कडक उन्हामुळे पिके कोमेजून जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly: आमदारांच्या कार्यकर्त्यांना विधिमंडळ परिसरात बंदी; अध्यक्षांचा निर्णय

Jal Jeevan Mission : लातूर जिल्ह्यातील गावागावांतील ‘जल जीवन’ला घरघर

Agrowon Podcast: बेदाण्याचे दर तेजीत, काकडीला मागणी, चिकू महागला; बाजरीचे दर स्थिर, तुरीचे दर दबावात

Flood Management : महापूर येऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या?

Crop Loan : खरिपासाठी ११७९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप

SCROLL FOR NEXT