
Nagpur News : विदर्भात ८ ते १० जुलै दरम्यान झालेल्या पावसामुळे सुमारे २८ हजार २७२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या संदर्भात प्रशासनाने संयुक्त अहवाल तयार केला असून तो भरपाईसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, अरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांपैकी यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांत नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, बाभुळगाव, पांढरकवडा, वणी, मारेगाव, झरी-जामणी हे तालुके सर्वाधिक बाधीत झाले.
या सहा तालुक्यांतील ६३ गावांमध्ये पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाल्याचा अहवाल आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे या एकाच तालुक्याला पावसाचा फटका बसला. या तालुक्यातील २८ गावे बाधित असून कापूस, सोयाबीन, तूर या पिकाचे नुकसान झाल्याची नोंद आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांनाही पावसाचा फटका बसला.
वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलूू, देवळी, आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट हे तालुके प्रभावित झाले. वर्धा जिल्ह्यात ३५९६ शेतकरी बाधित आहेत. नागपूरमधील कामठी, हिंगणा, सावनेर, काटोल, कळमेश्वर, नरखेड, रामटेक, पारशिनी, मौदा, उमरेड, भिवापूर, कुही या तालुक्यांत ९०११ शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
भंडारा जिल्ह्यात भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी, लाखांदूर या तालुक्यांतील १०९०२ शेतकऱ्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. गोंदियात केवळ सडक अर्जुनी तालुक्यातच पावसामुळे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
चंद्रपूरमध्ये मूल, सावली, ब्रम्हपूरी, पोंभूर्णा या तालुक्यांतील ७७८१ शेतकऱ्यांच्या धान, कापूस, सोयाबीन, तूर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, देसाईगंज, आरमोरी, करखेडा, कोरची अहेरी या तालुक्यांतील ५३३७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता भरपाईची प्रतीक्षा आहे.
जिल्हानिहाय पीक नुकसान (हेक्टरमध्ये)
यवतमाळ २४१४
अमरावती ९८०
वर्धा ३२१७
नागपूर ६८६९.३८
भंडारा ४९३६.७०
गोंदिया २.००
चंद्रपूर ६१०४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.