Drought  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Update : नव्या २२४ महसुल मंडलांत दुष्काळी स्थिती जाहीर

Drought Crisis : दुष्काळी परिस्थितीचा लाभ मिळावा, या साठी शासनाने दुष्काळसदृश जाहीर केलेल्या महसूल मंडलांच्या व्यतिरिक्त त्यात विभाजन करून नव्याने करण्यात आलेल्या मंडलांतही दुष्काळसदृश परिस्थिती शासनाने जाहीर केली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : दुष्काळी परिस्थितीचा लाभ मिळावा, या साठी शासनाने दुष्काळसदृश जाहीर केलेल्या महसूल मंडलांच्या व्यतिरिक्त त्यात विभाजन करून नव्याने करण्यात आलेल्या मंडलांतही दुष्काळसदृश परिस्थिती शासनाने जाहीर केली आहे. १९ जिल्ह्यांतील २२४ मंडलांचा यात समावेश आहे. या आधीप्रमाणेच नव्याने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश मंडलांत सर्व सवलती तातडीने लागू केल्या आहेत.

कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती असलेल्या ४० तालुक्यांत सुरवातीच्या काळात शासनाने दुष्काळी स्थिती जाहीर केली. त्यानंतर पुन्हा टंचाई असलेल्या व ज्या महसुली मंडलांत जून ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मलिमिटरपेक्षा कमी झाले आहे

अशा १०२१ मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली. तेथे सवलती लागू केल्या. या १०२१ मंडलांपैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूली मंडले स्थापन करण्यात आली आणि त्या मंडलांत अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही,

अशी नवीन महसूल मंडले देखील दुष्काळसदृश मंडले म्हणून जाहीर करावीत, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १९ जिल्ह्यांतील २२४ नवीन मंडले दुष्काळ सदृश घोषित केली आहेत. नव्याने जाहीर दुष्काळसदृश मंडलांत नगर जिल्ह्यातील सर्वाधिक ३४, त्या पाठोपाठ धुळ्यातील २३, जळगावातील २४ मडंलांचा समावेश आहे.

...या सवलती लागू

- जमीन महसुलात सूट

- सहकारी कर्जाचे पुनर्गठन

- शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती

-कृषिपंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट

- शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी

- रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता

- आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर

- शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे

जिल्हानिहाय जाहीर नवीन मंडले

पुणे ः १४, सातारा ः १२, सांगली ः २, सोलापूर ः १०, कोल्हापूर ः ५, नाशिक ः १३, धुळे ः २३, जळगाव ः २४, नगर ः ३४, छत्रपती संभाजीनगर ः १६, जालना ः ३, परभणी ः १३, हिंगोली ः ७, नांदेड ः ५, लातूर ः ६, बीड ः १९, धाराशिव ः १०, नागपूर ः ५, वर्धा ः ३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT