Drought Condition : दुष्काळ शमविण्यासाठी कूपनलिकांकडे ओढ

Water Crisis : दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कूपनलिका घेण्याचे प्रमाण दरवर्षीपेक्षा दुपटीने वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
Borewell
Borewell Agrowon
Published on
Updated on

Karmala News : करमाळा तालुक्याला उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची चाहूल लागली आहे. दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कूपनलिका घेण्याचे प्रमाण दरवर्षीपेक्षा दुपटीने वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पिके वाचवण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी सध्या लोकांनी कूपनलिका घेण्याला पसंती दिली आहे.

करमाळा तालुक्यात दररोज कूपनलिका घेण्यासाठी साधारणपणे २० ते २२ लाख रुपये खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्यक्षात मात्र कूपनलिकेला पाणी किती लागते आणि लागलेले पाणी किती दिवस टिकणार, याविषयी मात्र प्रश्नचिन्ह आहे. करमाळा तालुक्याला सगळ्यात मोठा पाण्याचा स्रोत उजनी धरण आहे. मात्र, जानेवारीमध्येच उजनी धरण उणेमध्ये गेल्याने उजनी धरण परिसरातील शेतकरी देखील धास्तावलेले आहेत. परिणामी, कधी नव्हे ते या वर्षी उजनी परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर कूपनलिका घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

Borewell
Water Crisis : जालन्यात रोज पडतेय टँकर संख्येत भर

करमाळा तालुक्यात साधारणपणे १० उभ्या व पाच आडव्या बोअरवेलच्या गाड्या दररोज सुरू आहेत. सरासरी एक गाडी पाच कूपनलिका घेत आहे. म्हणजे करमाळा तालुक्यात साधारणपणे दररोज ५० कूपनलिका घेतल्या जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कूपनलिका घेतल्या जात असून, येणाऱ्या मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत या कूपनलिका घेण्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे.

गेल्या वर्षी पाऊस वेळेवर न झाल्यामुळे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांतील उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. येणाऱ्या काळात आहे ती पिके टिकवण्यासाठी तालुक्यातील बोरगाव, वीट, झरे, राजुरी, वाशिंबे, आळजापूर, कोर्टी, सावडी, कुंभारगाव, उमरड, विहाळ, पोंधवडी, गौंडरे, पांडे, जेऊर, चिखलठाण, वांगी, बाळेवाडी, तरटगाव या भागात कूपनलिका घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी लागत नाही, मात्र शेतकरी आशेपोटी कूपनलिका घेत आहेत.

Borewell
Water Crisis : उमरगा, लोहारा तालुक्यांतील बारा तलाव कोरडे

कूपनलिकेसाठी प्रतिफूट दर

कूपनलिका घेण्यासाठी सरासरी ७७ रुपये प्रतिफुटाला दर असून, एक कूपनलिका घेण्यासाठी ३५ ते ४० हजार रुपये लागत आहेत. ४०० फूट कूपनलिका घेण्यासाठी क्रेसिंग पाइप १० केजीचा ४०० रुपये फूट तर ६ केजीचा ३५० रुपये फूट आहे. ३०० फुटांपर्यंत कूपनलिकेचा दर ७७ तर ३०० ते ४०० फुटांपर्यंतचा दर ८२ रुपये आणि ४०० फुटांवर तर ४०० ते ५०० फुटांच्या पुढे ८७ रुपये प्रतिफूट दर घेतला जातो. ५०० ते ६०० फुटांपर्यंत ९२ रुपये दर घेतला जातो.

या वर्षी पाऊस कमी झाल्याने विहिरीचे पाणी कमी झाले. अशा परिस्थितीत शेतातील सीताफळ, मोसंबी, कांदा, पपई व ऊस कसा जगवायचा, यासाठी मी कूपनलिका घेण्याचे ठरवले. कूपनलिका घेतल्यानंतर चांगले पाणी लागले आहे. त्यामुळे शेतातील पिके वाचतील, अशी आशा आहे.
रामभाऊ नलवडे, बाळेवाडी, ता. करमाळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com