Kolhapur Farmer Drought : दुष्काळाच्या धास्तीने शेतकरी उसाऐवजी ज्वारी पिकाकडे वळतोय

Sugarcane Production : उसाला फाटा देत दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिकाकडे दुर्लक्ष केले आहे.
Kolhapur Farmer Drought
Kolhapur Farmer Droughtagrowon

Kolhapur Drought Condition : कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाळी हंगाम फेब्रुवारीपासून सुरू झाला असून सुमारे दीडशे हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती आणि पाणी उपसाबंदी, तसेच ऊस तोडणी हंगाम उशिरा एक महिना सुरू झाला यामुळे उन्हाळी हंगामातील पिकाखालील क्षेत्र घटणार असल्याचे दिसून येत आहे.

उसाला फाटा देत दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिकाकडे दुर्लक्ष केले आहे. तर जिल्ह्यात ज्वारीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात लागवड केली असल्याचे चित्र आहे. गतवर्षी पावसाळ्यात सुमारे ५० टक्के पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पिकाला फाटा देत जनावरांसाठी चारा पिकाची तजवीज म्हणून ज्वारी पिकाची लागवड केली आहे. फेब्रुवारीपासून मे पर्यंत उन्हाळी हंगाम असून या हंगामातील पेरणीला सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात सर्वसाधारण ४ हजार ४७८ हेक्टर उन्हाळी हंगामातील क्षेत्र असते. यामध्ये भात सुमारे ३०० हेक्टर, मक्का सहाशे हेक्टर, मूग पाचशे हेक्टर, सूर्यफूल १८० हेक्टर, भुईमूग ११५० हेक्टर, सोयाबीन सोळाशे पन्नास हेक्टर क्षेत्र असते. शिरोळ, हातकणंगले येथे सुमारे ५०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

उन्हाळी हंगामात सोयाबीनवर तांबेरा रोग पडतो. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक घेणे कमी केले आहे. उसाचा हंगाम जोरात असून ऊस तुटल्यानंतर खोडव्यात आंतरपीक म्हणून भुईमूग, मका पिकाची लागवड केली जात आहे.

Kolhapur Farmer Drought
Kolhapur and Sangli Flood : महापूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या १८ सूचना, पुराचे पाणी दुष्काळी भागात जाणार?

भुईमूग पिकावर कीड रोग अद्याप नाही. काही प्रमाणात सूर्यफूल पिकाच्या बियाणाला मागणी आहे. खोडवा पिकात आंतरपीक म्हणून भुईमूग व मका पीक घेतले जात आहे. वैरणीसाठी मका करण्याऐवजी खाण्यासाठी मका व जनावरांसाठी कडबा असा दुहेरी फायदा होत असलेला मका शेतकऱ्यांनी घेतला आहे.

राजू नाळे, शेतकरी व कृषी दुकानदार सांगरूळ

८८ उन्हाळी हंगामासाठी खते बियाणे उपलब्ध आहेत. पाण्याअभावी क्षेत्र कमी होईल. उपसा बंदीचा परिणाम जाणवतो. कमी कालावधीत येणारी पिके, भाजीपाला शेतकऱ्यांनी घ्यावा. हिरवळीची खते घेऊन जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, तसेच जमिनीला विसावा देता येईल, याकडे लक्ष द्यावे. चाऱ्याची पिके करावीत.

अरुण भिंगारदेवे, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com