Weekly Market Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : आठवडे बाजारांवर दुष्काळाचे सावट

Weekly Market Condition : एप्रिलपासून वाढलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे जिवाची लाहीलाही होत आहे. यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील आठवडे बाजारांवर होत आहे.

Team Agrowon

Nashik News : एप्रिलपासून वाढलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे जिवाची लाहीलाही होत आहे. यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील आठवडे बाजारांवर होत आहे. या परिस्थितीत बाजारासाठी बाहेर पडणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.

त्यामुळे होणारी उलाढाल निम्म्यावर आली असल्याची स्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण सध्या मंदीत सापडल्याचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहेत. यामुळे यंदाचे दुष्काळाचे सावट अडचणी वाढविणारे आहे.

गतवर्षी झालेल्या कमी पावसामुळे यंदा विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी भाजीपाला लागवडी घटलेल्या आहेत. याबरोबरच ज्या ठिकाणी भाजीपाला लागवडी आहेत. त्या ठिकाणी तापमानाच्या वाढीमुळे त्या अडचणीत आल्या आहेत.

अशा परिस्थितीत बाजारात स्थानिक ठिकाणी भाजीपाल्याची उपलब्धता कमी आहे. याशिवाय शेतीवर उदरनिर्वाह असणारे शेतमजूर व शेती उत्पन्नातून उलाढाल करणारे शेतकऱ्यांचे अर्थकारण अडचणीत आल्याने शांतता पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम आठवडे बाजारांवर झाला आहे.

सकाळी ९ पासून उन्हाचा चटका जाणवत असल्याने आठवडे बाजारात ग्राहक बाजारात फिरकत नाहीत. त्यामुळे सकाळी ११ पर्यंत व दुपारी चारनंतर गर्दी होते. मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्राहक संख्या घटल्याने ग्रामीण अर्थकारण अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.

ग्रामीण भागात प्रामुख्याने भाजीपाला, फळे, किराणा, मसाले, कपडे आणि घरातील वस्तू खरेदीसाठी व कुटुंबीयांसाठी खाऊ यासाठी आठवडे बाजाराला पसंती असते. मात्र यंदा हा फटका बसत असल्याने बाजारावर मंदीचे सावट आहे. प्रामुख्याने नांदगाव, चांदवड, मालेगाव, येवला, सटाणा, देवळा, सिन्नर व कळवण या भागांत आठवडे बाजारात शांतता आहे.

...या गावांमध्ये भरतो मोठा बाजार

नांदगाव, मनमाड, न्यायडोंगरी, बोलठाण, साकोरा, हिसवळ,

चांदवड, वडाळीभोई, वडनेरभैरव, काजीसांगवी, उसवाड

मालेगाव, रावळगाव, वडेल, झोडगे, सौंदाणे, येसगाव, दाभाडी

येवला, नगरसुल, जळगाव, पाटोदा, अंदरसुल, मुखेड

कळवण, अभोणा, कनाशी, जयदर, बेज, मोकभणगी, देसराणे

देवळा, उमराणे, मेशी, लोहोणेर, दहिवड, खर्डे, वाखारी

सटाणा, डांगसौंदाणे, जोराने, कंधाने, लखमापूर, ब्राह्मणगाव, ताहाराबाद, मुल्हेर, तळवाडे दिगर, जायखेडा, नामपूर

सिन्नर, नांदूर शिंगोटे, चास, ठाणगाव, वावी, वडांगळी, पांढुर्ली

निफाड, लासलगाव, चांदोरी

कडक ऊन व दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक जण आठवडे बाजारात येत नाहीत. त्यामुळे आठवडे बाजारावर अवलंबून असणारे व्यावसायिक अडचणीत आले असून, कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्‍न आहे. आणखी किमान महिनाभर बाजारावर मंदीचे सावट राहील.
कैलास वाघ, भाजीपाला विक्रेता, ब्राह्मणगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Shortage : युरियाचा कमी वापर करा, ८०० रुपये मिळवा, आंध्र प्रदेशला असा निर्णय का घ्यावा लागला?

Village Rehabilitation: मसाळा गावातील केवळ २८८ घरांचेच पुनर्वसन शक्य 

AI in Agriculture: कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे माती, पिकांची आरोग्य तपासणी

Panand Road: परभणी जिल्ह्यात आजपासून शेत रस्ते विषयक मोहीम

Interview with Pasha Patel: पृथ्वी व मानवजातीच्या शाश्वत विकासाचा मार्ग

SCROLL FOR NEXT