Market Tax : वणी आठवडे बाजारात जादा करवसुलीने व्यापाऱ्यांसह शेतकरी त्रस्त

Farmer Issue : दिंडोरी येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात ठेकेदार शेतकरी-विक्रेत्यांकडून मनमानी करवसुली करीत असून, दरपत्रकाच्या फलकाचे बंधन पायदळी तुडविले जात आहे.
Weekly  Market
Weekly MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : दिंडोरी येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात ठेकेदार शेतकरी-विक्रेत्यांकडून मनमानी करवसुली करीत असून, दरपत्रकाच्या फलकाचे बंधन पायदळी तुडविले जात आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांना आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याने विक्रेते व शेतकरी त्रस्त झाले आहेत. आठवडे बाजार करवसुली ठेकेदाराकडून केली जाते. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत करवसुलीसाठी ठेका दिला आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने ठरवून दिलेल्या दराच्या चार ते पाच पट करवसुली केली जाते. याबाबत ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. भाजीपाला पाटी किंवा कॅरेटसाठी दहा रुपये कर आकारला पाहिजे. मात्र कधी ३०, तर कधी ४० रुपये आकारण्यात येतात. १० बाय १५ फुटांच्या दुकानाच्या पालास २० रुपये कर आकारणीऐवजी १०० ते १५० रुपयांची,

Weekly  Market
Non Basmati White Rice : मलेशिया भारताकडे करणार ५ लाख टन तांदळाची मागणी

तर कधी २०० रुपयांची आकारणी केली जात आहे. परिणामी, बाजारात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची माल विक्रीस आणण्यासाठी संख्या रोडावली आहे. आठवडे बाजार करवसुलीचा लिलाव ३२ लाखांना गेला आहे. करवसुली करताना ठेकेदाराकडून जास्तीचा कर आकारला जातो. त्याच्या पावत्या दिल्या जात नाही.

सुविधांची वाणवा

आठवडे बाजार करवसुली ठेक्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. ४० टक्के रक्कम अजूनही ठेकेदाराकडून ग्रामपंचायतीस येणे बाकी आहे. आठवडे बाजारात ग्रामपंचायतीचा दरफलकही लावलेला नाही. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा व शौचालयही नाही. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.

Weekly  Market
Agricultural Pump Seized : पाचोरा केटी वेअर बंधाऱ्यातून शेतीपंप जप्त
आठवडे बाजारात तीन कॅरेट वांगे विक्रीसाठी आणले असता, विक्री पावती म्हणून शंभर रुपये घेतले. मात्र पावती दिली नाही. बाजारात शेतीमाल आणण्याचे भाडे, बाजारात अव्वाच्या सव्वा वसुली होत असल्याने शेतमाल विक्रीस आणायला परवडत नाही.
देविदास चव्हाण, शेतकरी, अहिवंतवाडी
वणी आठवडे बाजारात ठेकेदाराकडून मनमानीने वसुली होत असल्याच्या शेतकरी व व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. याबाबत सरपंच, उपसरपंचांना माहिती दिली आहे. ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या अटीशर्ती व ठरवून दिलेल्या दरानुसारच व्यापारी व शेतकऱ्यांनी कर द्यावेत. आलेल्या तक्रारींची ग्रामपंचायत प्रशासनाने कडक कारवाई करावी.
-विजय बर्डे, ग्रामपंचायत सदस्य, वणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com