Solapur News: सीना नदीला आलेल्या महापुरात माढा तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील केवड, उंदरगाव, वाकाव, दारफळ, राहुलनगर, निमगाव, तांदूळवाडी, म्हैसगाव या गावातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे बेदाणा शेड महापुरात वाहून गेले आहेत. .कांद्याच्या चाळी वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांची विविध पिके, फळबागा पाण्याखाली गेल्या होत्या. पूरग्रस्तांना अजूनही मदत मिळालेली नाही. शासनाची मदत तत्काळ मिळवून द्यावी, .Flood Issue : पुराने उपजीविकेचे साधनच हिसकावून घेतले.अशी मागणी सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघांचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे. चेअरमन शिंदे यांनी माढा तालुक्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. महापुरात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून वाहून गेल्या आहेत. .Flood Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात खरीप पुरता ‘पाण्यात’.ज्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, लहान मोठ्या व्यावसायिकांचे महापुरात मोठे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना, व्यवसायकांना अद्याप पर्यंत आर्थिक मदत मिळालेली नाही. यांना ताबडतोब आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. .शासनाकडून नुकतीच मोडनिंब येथे मंजूर केलेल्या एमआयडीसीची भूसंपादन प्रक्रिया तातडीने सुरु करावी. यासह इतर प्रमुख प्रश्नासंदर्भातील निवेदन देण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.