Yavatmal News: यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भात कापूस व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी रासायनिक खते, फवारण्या व ओलिताच्या बळावर कापूस पीक वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कापूस पीक भरात असताना प्रथम लाल्या रोगाचे आणि त्यानंतर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने संपूर्ण कापूस पीक धोक्यात आले आहे..लागवडीचा खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने बँकांचे कर्ज, सावकारी कर्ज, लग्नकार्य, मुलांचे शिक्षण या ओळीचा भार कसा पेलायचा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. आधी अवकाळी पावसाने आणि आता बोंडअळीने डोळ्यादेखत पीक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. .Farmer Crisis: शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप राज्य सरकारने केले.नुकतेच राज्याचे हिवाळी अधिवेशन पार पडले. अधिवेशनात विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली असली, तरी विदर्भ हा कापूस उत्पादनाचा प्रमुख भाग असूनही कापसावर आलेल्या लाल्या व बोंडअळी या समस्येवर एकाही लोकप्रतिनिधीने सभागृहात प्रश्न उपस्थित केला नाही. तसेच शासनाकडून कोणतीही विशेष मदत जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांची नाराजी वाढली आहे..Farmer Crisis: कितीही संकटे आली तरी शेतकरी उमेद हारत नाही : आसाराम लोमटे.यावर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसाने कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी फरदड कापूस घेऊ नये.नुकसानीची पातळी अधिक असल्यास शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करावी.- जी. जे. बळवंतकर, तालुका कृषी अधिकारी, पांढरकवडा.मागील दोन-तीन वर्षांपासून कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव नव्हता. मात्र यावर्षी अचानक बोंडअळीने संपूर्ण शेतात आक्रमण केल्याने कापूस हातात येण्याची आशा मावळली आहे. शासनाने लाल्या व बोंडअळीच्या नुकसानीसाठी तातडीची आर्थिक मदत जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे.- राजू कुर्रेवार, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.