Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Summer Heat Update : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत किमान २३ अंश सेल्सिअस तर कमाल ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Weather Update
Weather UpdateAgrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांत दिवस तसेच रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे. परिणामी वातावरणातील उकाडा वाढला आहे. सोमवारी (ता. ६) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत किमान २३ अंश सेल्सिअस तर कमाल ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Weather Update
Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

शनिवारी (ता. ४) दुपारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागातील वेधशाळेत कमाल ४२.६ अंश सेल्सिअस तर परभणी शहरातील हवामान विभागाच्या हवामान केंद्रात ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी (ता. ५) कृषी विद्यापीठ वेधशाळेत किमान २२.४ तर कमाल ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी शहरात कमाल ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Weather Update
Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

तापमानात वाढ झाल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. पिकांची पाण्याची गरज वाढली आहे. केळी तसेच भाजीपाला पिकावर तापमान वाढीचा प्रतिकूल परिणाम होत आहे. अबालवृद्धांना उकाडा असह्य होत आहे.

मंगळवारपासून (ता. ७) दोन तीन दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण, तसेच तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात काही अंशी घट होईल. त्यानंतर उष्णतेची लाट राहू शकते, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मोसम सेवा प्रकल्पाचे समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com